पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पौरुषत्व आणि तारुण्य कायम ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन सुरु करावे. पुरुषांसाठी एखाद्या जादुप्रमाणे हे उपाय आहेत. आपल्याकडे पेंड मुख्यतः पशुखाद्य रुपात वापरली जाते, परंतु शारीरिक ताकद वाढवण्यासाठीसुद्धा ही रामबाण उपाय आहे.

पेंडीचा उपाय करण्यासाठी ५० ग्रॅम सरकी पेंड भाजून पावडर तयार करून घ्यावी. त्यानंतर एवढ्याच प्रमाणात मुसळी (आयुर्वेदिक चूर्ण) यामध्ये मिसळून घ्यावे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तीन-तीन ग्रॅम हे मिश्रण दुधातून घ्यावे. या उपायाने ताकद आणि वीर्य वाढण्यास मदत होते. तसेच आणखी एक उपाय मालकांगोणी वापरून करता येतो. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती असून संस्कृतमध्ये या वनस्पतीला ज्योतिष्मती म्हणतात. २५० ग्रॅम मालकांगोणी गायीच्या शुद्ध तुपात भाजून घेऊन यामध्ये एवढेच साखर टाकून पावडर तयार करून घ्या. ४० दिवस ही पावडर सहा ग्रॅम प्रमाणात घेऊन गाईच्या दुधातून सकाळ-संध्याकाळ घ्या. यामुळे ताकद आणि यौनशक्ती वाढते.

हरभरेचा उपायही यासाठी लाभदायक आहे. यासाठी रात्रभर १०० मिलीलीटर कच्च्या दुधात भिजवलेले ५० ग्रॅम हरभरे सकाळी-सकाळी मनुका आणि बारीक खडीसाखरसोबत चांगल्याप्रकारे चावून-चावून खा. जवळपास ४० दिवस नियमितपणे अशाप्रकारे हरभरे खाल्ल्यास ताकद आणि वीर्य वाढते. दुसरा उपाय पांढरी मुसळीचा आहे. आवळा पावडर, गुळवेल रस, पांढरी मुसळी पावडर, गोखुर पावडर एकत्र करून घ्या. या मिश्रणात बारीक खडीसाखर मिसळून ठेवा आणि दररोज सकाळ-संध्याकाळ १० ते १५ ग्रॅम हे मिश्रण गरम दुधातून घ्या. हे चूर्ण तीन ते चार महिने नियमितपणे घेतल्यास व्यक्तीची यौनशक्ती वाढते.

गहू पाण्यात भिजवून त्याचे साल काढून घ्या आणि गाईच्या दुधात खीर तयार करा. दररोज अशाप्रकारे खीर खाल्ल्यास ताकद वाढते आणि संभोग शक्तीचा विकास होतो. तसेच लिंबू आणि मनुका एकत्र करून खाल्ल्यास तारुण्य कायम राहते. रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू पिळून त्यामध्ये दोन-तीन मनुका भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून चाहसारखे पिउन घ्या. त्यानंतर ग्लासातील मनुका चावून-चावून खा. शक्ती आणि पौरुषत्व वाढवण्याचा हा रामबाण उपाय आहे. शिवाय दालचिनीसुद्धा संभोग शक्ती वाढवण्यास मदत करते. थोडीशी दालचिनी बारीक करून पावडर तयार करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी जवळपास २ ग्रॅम पावडर गरम दुधातून मधासोबत घ्या. या उपायाने यौन शक्ती वाढेल तसेच वीर्य म्हणजे धातूची कमतरता दूर होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु