दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी

दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे हार्ट अटॅकचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. शिवाय, ही समस्या पूर्वी वयस्कर लोकांमध्ये दिसून येत होती, आता ती तरूणांमध्येही दिसून येत आहे. यासाठी हार्ट अटॅक का येतो, याविषयी जाणून घेतले पाहिजे. दिनक्रमात काही चुका आपल्याकडून नकळत घडत असतात, यामुळे हार्ट अटॅक येतो. या चूकांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

कमी झोप
झोपेच्या कमतरतेमुळे राग आणि थकवा वाढतो. परंतू यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. कमी झोप घेतल्याने ब्लड प्रेशर वाढते आणि हार्टला सूज येते.

मायग्रेन 
मायग्रेनचा त्रास असल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. त्रासदायक आवाज, लाइट किंवा फीलिंग्समुळे डोकेदुखी होत असेल तर यांचा संबंध हार्ट प्रॉब्लेमशी असू शकतो.

जास्त आहार
जास्त आहार घेणे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. जास्त आहारामुळे कंबर आणि पोटावर फॅट वाढते. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु