‘या’ ७ प्रकारच्‍या लोकांना आहे ‘हार्ट अटॅक’चा सर्वाधिक धोका ! वेळीच द्या लक्ष

‘या’ ७ प्रकारच्‍या लोकांना आहे ‘हार्ट अटॅक’चा सर्वाधिक धोका ! वेळीच द्या लक्ष

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका हा लठ्ठ व्‍यक्‍तींना असतो, असे म्हटले जाते. परंतु, सडपातळ आणि फिट असणारांनाही आरोग्‍याकडे जास्त दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो. बदललेली जीवनशैली, चूकीचा आहार, सततचा ताणतणाव यामुळे अलिकडे हार्ट अटॅकचे प्रमाण खुपच वाढले आहे. विशेष म्हणजे तरूणांमध्येही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅक येण्याचा धोका कुणाला सर्वाधिक असतो, आणि तो का येतो हे जाणून घेतले तर हा गंभीर आजार दूर ठेवणे शक्य आहे. यासाठी आपण हार्ट अटॅक कोणाला येऊ शकतो, याची माहिती घेणार आहोत.

या व्यक्तींना येऊ शकतो हार्ट अटॅक

१ लठ्ठ व्‍यक्‍ती
ज्‍यांच्‍या शरीरामध्‍ये प्रमाणाहून अधिक फॅट असते. त्‍यांना हाय बीपी व डायबिटीज होण्‍याची शक्‍यता अधिक असते. कोलेस्टेरॉलचे प्रमाणही त्‍यांच्‍या शरीरामध्‍ये अधिक असते. यामुळे अशा व्‍यक्‍तींना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो.

२ जेनेटिक
ज्‍या व्‍यक्‍तींचे आईवडील ह्र्दयाच्‍या आजाराने ग्रस्‍त असतात, त्‍यांनाही हार्ट अटॅक येण्‍याची शक्‍यता अधिक असते.

३ डायबिटीक
ज्‍यांना डायबिटीजची समस्‍या असते त्‍यांच्‍या नसांमध्‍ये ब्‍लॉकेज होण्‍याची शक्‍यताही अधिक असते. यामुळे अशा व्‍यक्‍तींनाही हार्ट अटॅक येण्‍याचा धोका असतो.

४ उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब असल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. अशावेळी हार्ट अटॅकचा धोका वाढतो. व्यक्ती सडपातळ असली तरी असे होते.

५ धुम्रपान
धुम्रपानामुळे हार्टमध्ये रक्त पोहोचवत असलेल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

६ वाढते वय
व्यक्ती लठ्ठ असो की सडपातळ वाढत्या वयासोबत आरोग्याकडे लक्ष न दिल्याने आणि व्यायाम न केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हार्ट अटॅक येतो.

७ फिजिकली अ‍ॅक्टिव्ह
सडपातळ लोक फिजिकली अ‍ॅक्टिव्ह नसतील तर त्यांच्यात हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु