पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या जीवनात शरीर निरोगी ठेवणे खूप अवघड होऊन बसले आहे. मात्र, निरोगी राहण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असते. जर पोट साफ नसेल तर अनेक आजार उद्भवू शकतात. पोट साफ ठेवण्यासाठी पचनक्रिया व्यस्थित होणे गरजेचे आहे. आयुर्वेदात पोटाच्या समस्यांवर विविध उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास पोटाच्या तक्रारी कधीच उद्भवणार नाहीत. मात्र काही सवयी यासाठी बदलल्या पाहिजेत.पोटाशी निगडित समस्या दुर करण्यासाठी अवेळी जेवण करू नये.

संध्याकाळचे जेवण झोपण्यापूर्वी कमीत कमी तीनतास आगोदर करावे. शिळे, मैद्याचे अथवा तेलाचे पदार्थ खाऊ नयेत. चहा, कॉफीचे सेवन जेवणा अगोदर किंवा नंतर करू नये यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होत नाही. पुरेशी झोप न घेतल्याने सुद्धा पोटाच्या समस्या होतात. नेहमी एका ठरवलेल्या वेळीच जेवण केले पाहिजे. कडकडून भुक लागल्यावरच जेवण करावे. जर वेळेवर भुक लागली नसेल तर जेवण करू नये. जेवणापूर्वी अथवा जेवणानंतर एक-दोन घोटांपेक्षा जास्ती पाणी पिऊ नये. जेवणानंतर लगेच झोपू नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु