अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय

अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  खोकला, ताप यावर अडुळसाचा रस हा रामबाण उपाय आहे. अडुळसा, ज्येष्ठमध, बेहडा, हळकुंड, फुलवलेल्या टाकणखारचे समप्रमाणातील मिश्रण मोठ्यांनी २ ग्रॅम व लहानांनी १ ग्रॅम मधासोबत आठवडाभर घेतल्यास खोकला बरा होतो. अडुळसाचा वापर केल्यास अन्य आजारातही चांगला फायदा होतो. याविषयी जाणून घेवूयात.

असा तयार करा अवलेह
एक लिटर अडुळशाच्या रसात पाव किलो साखर टाका. मंदाग्नीवर ठेवा. यास चांगली तार आल्यावर उतरून ठेवा. हा रस थोडा थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धा लिटर मध व १०० ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण बरणीत भरा. काही दिवसांत अवलेह मुरल्यावर औषध म्हणून वापर करा.

हे आहेत उपाय

दमा
अडुळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्यास छातीतील कफ पातळ होतो.

डोकेदुखी
डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावावा. याच्या पानांना शेकून रस काढला तर चांगला रस निघतो.

जखम, व्रण
अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधावी. जखम भरून येते.

जीर्ण ज्वर
अडुळशाचा अवलेह घेल्यास चांगला फरक पडतो.

श्वास विकार
अडुळशाच्या रसात मध आणि पिंपळीचे टाकून चाटण करावे. श्वासाचा विकार बरा होतो. श्वास लागणे कमी होते.

रक्तपित्त
रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास १० मि. लि. अडुळशाच्या रसात तितकीच खडीसाखर घालून घ्यावी. या पानांचा डोक्यावर लेप घालावा. नाकातून वाहणारे रक्त बंद होते.

प्रदरावर
प्रदरावर अडुळशाचा रस १० मि.लि. व खडीसाखर १० ग्रॅम, रोज तीन वेळा घ्यावी. अंगावरून पांढरे जाणे, अंगावरून पाणी जाणे, पाळीच्या स्रावात दुर्गंधी, अतिस्राव, कमी स्राव, गुठळ्या पडणे या समस्या दूर होतात.

देवीची साथ
अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ मुलांना दिल्यास देवी येण्याची भीती कमी होते.

क्षयरोग
अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा घालून पाव लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा. हा काढा क्षयरोगावर रामबाण आहे. अडुळशाचा अवलेह सुद्धा घेऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु