तुमच्या घरातच आहेत ‘या’ गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला होऊ शकतो कॅन्सरसारखा आजार

तुमच्या घरातच आहेत ‘या’ गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला होऊ शकतो कॅन्सरसारखा आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. धुम्रपान, प्रदूषण, आहार आणि जीवनशैली यामुळे कॅन्सर होतो, ऐवढीच कारणे आपल्याला माहित असतात. परंतु घरातच असलेल्या काही तत्वांमुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. या गोष्टींचा कदाचित आपण विचारही करत नाही. या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असतात. परंतु, याच गोष्टींमुळे कॅन्सरसारखा आजार आपल्याला कधी जडतो हे समजतदेखील नाही. या कोणत्या गोष्टी आहेत, त्यांची माहिती घेवूयात.

फ्रेंच फ्राइज
ऑक्रीलामाइड नावाचे एक केमिकल हे दुषित पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते. फ्रेंच फ्राइज बनवताना या तत्वाचा वापर केला जातो. यातील अ‍ॅमीनो अ‍ॅसिड एस्पराजिन या पदार्थांमध्ये उपलब्ध असलेल्या साखरेशी प्रतिक्रिया करून ऑक्रीलामाइड तत्व तयार होते. या तत्वासोबत शरीरात झालेल्या रासायनिक क्रियेमुळे डीएनएचे नुकसान होते. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

ब्राउन राइस
ब्राउन राइसमध्ये ऑर्सेनिक नावाचे तत्व असते. यामुळे कॅन्सर होऊ शकतो. काही ब्राउन राइस ब्रँडमध्ये विषारी तत्व आढळून येतात. ऑर्सेनिक तत्व डीएनएच्या रिपेअर सिस्टीमचे नुकसान करतात. कोशिकांना नष्ट केल्यानंतर डीएनए पुन्हा त्यांना निर्माण करू शकत नाही. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

ई सिगरेट
ई सिगरेटमधील नायटरोसामिन्स तत्वामुळे कॅन्सर होऊ शकतो. तंबाखूतील नायटरोसामिन्स तत्व कॅन्सर उत्पन्न करते. काही ई सिगरेटमध्ये हे तत्व आढळून येते.

चिप्स आणि ब्रेड
ब्रेड आणि चिप्समध्येसुद्धा ऑक्रीलामाइडचा वापर केला जातो. यातील अ‍ॅमीनो अ‍ॅसिड एस्पराजिन साखरेशी प्रतिक्रिया करून घातक ऑक्रीलामाइड तत्व निर्माण होते. हे तत्व डीएनएला नुकसान पोहचवून कॅन्सरचा धोका वाढवते.

डिटर्जंट
डिटर्जंट कपड्यावरील डाग काढण्याचे काम करते. मात्र डिटर्जंट काही विषारी पदार्थ सोडून जातो. डिटर्जंटमध्ये आढळून येणारे १, ४ डिओक्सिन तत्व कॅन्सरचे कारण ठरत नाही. परंतु उंदरांमध्ये नाकाचा कॅन्सर निर्माण करू शकते. सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे सामान्यतः डिटर्जंटच्या कंपन्या या तत्वाचा उल्लेख करत नाहीत.

रिंकल फ्री शर्ट
नि: संक्रमकचा वापर शव दीर्घकाळपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. तसेच हे तत्व रिंकल फ्री शर्टमध्येही वापरले जाते. जिवंत व्यक्तीला हे तत्व नुकसानकारक ठरू शकते. फोरमाल्डेहाईड तत्व नाक आणि श्वसनसंबंधी कॅन्सरचे कारण ठरू शकते.

स्टीरोफॉम कप आणि कंटेनर
स्टीरोफॉम कपमधून चहा किंवा इतर कोणत्या पेयाचे सेवन केल्यास कॅन्सर होऊ शकतो. हे कप स्टिरेनपासून बनवलेले असतात. हे एक घातक तत्व असून शरीरातील डीएनएला नुकसान पोहचवू शकते. हे मानवाच्या शरीरातील कोशिकांना नष्ट करून कॅन्सरला आमंत्रण देते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु