२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही पदार्थ असे असतात ज्यांचे सेवन आपण दररोज करतो, मात्र त्यांचे औषधी गुण आपल्याला माहित नसतात. अशाच काही उपयोगी पदार्थांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे घरगुती उपाय करून विविध आजारातून मुक्त होणे शक्य आहे.

आजार आणि उपाय

* चक्कर येत असल्यास अर्धा ग्लास पाण्यात दोन लवंग टाकून पाणी उकळवून घ्यावे. हे पाणी थंड करून प्यावे, आराम मिळतो.

* लिंबातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यासाठी नियमितपणे लिंबू रस प्यावा.

* सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा जिरे खाल्ल्याने नजर चांगली होते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो.

* डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसावेत. असे लागोपाठ केल्याने जळजळ कमी होते.

* संसर्गामुळे दात दुखत असतील तर लसणाच्या दोन-तीन कच्च्या पाकळ्या चावून खाव्यात. संसर्ग दूर होऊन वेदनाही कमी होतील.

* रक्तदाबाचा त्रास होत असल्यास काही बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी साली काढून ते एक ग्लास दुधात उकळवावेत. दूध कोमट झाल्यानंतर प्यावे.

* कोबी आणि गाजर समप्रमाणात घेऊन त्याचा ज्यूस तयार करावा. हा ज्यूस सकाळ, संध्याकाळ एक-एक कप पिल्याने पेप्टिक अल्सरमध्ये आराम मिळतो.

* पोटात काही समस्या निर्माण झाल्यास चार-पाच पाने कढीपत्ता वाटून ताकात मिसळावा. रिकाम्यापोटी हे ताक प्यावे लगेच आराम मिळतो.

* कफ झाला असल्यास मुळ्याचा रस प्यावा. कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

* अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास मनुके टाकून दूध उकळून घ्यावेत. हे दूध थंड करून प्यावे. अ‍ॅसिडिटी दूर होते.

* नाशपती नियमित खाल्ल्यास यातील रासायनिक घटक पित्ताचा खडा तयार होण्यास प्रतिबंध करतात.

* आबंट कच्च्या सफरचंदाचा रस काढून हा रस दिवसातून तीन वेळा मस्सावर लावावा. नियमितपणे लावल्यास मस्स कमी होतात.

* स्ट्रॉबेरी, रासबेरी किंवा चेरीचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहते. तसेच युरिनरी इंफेक्शन कमी होते.

* मूठभर सुका मेव्याचे सेवन दररोज केल्याने ऊर्जा पातळी दिवसभर टिकून राहते. सुका मेवा हेल्दी स्नॅक्सप्रमाणे काम करतो.

* अर्धशिशीचा त्रास असल्यास पुदिन्याची ताजी पाने पाण्यात उकडून मिंट टी तयार करावा. हा चहा पिल्याने डोकेदुखी कमी होते.

* पोटात गॅस होत असल्यास एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा हळद आणि चिमूटभर सैंधव मिसळून सेवन करावे. गॅस राहणार नाही.

* मुलांच्या आहारात दररोज एका गाजराचा समावेश केल्यास त्यांचा मेंदू तल्लख होतो. शारीरिक व मानसिक विकासही चांगला होतो.

* तारुण्यपीटिका घालवण्यासाठी त्यावर अंड्यातील पांढरा भाग लावावा. यामुळे तारुण्यपीटिका लवकर वाळतात आणि डागही जातात.

* देशी गुलाबाच्या ९-१० पाकळ्या एक ग्लास पाण्यात काही तासांसाठी भिजवून ठेवाव्यात. या पाण्याने नियमितपणे डोळे धुतल्याने थकवा दूर होतो.

* सोफ साखरेसोबत वाटून घ्यावी. हे सुमारे ५ ग्रॅम चूर्ण हलक्या कोमट पाण्यासोबत  झोपताना घ्यावे. यामुळे पोटाच्या समस्या व मलावरोध दूर होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु