‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही आजारांसाठी अ‍ॅलोपॅथीक औषधांपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावकारी ठरतात. तसेच यामुळे शरीराला कोणतेही नुकसान पोहचत नाही. त्यामुळे काही आजार उद्भवल्यास घरच्याघरी उपाय करणे कधीही चांगले ठरते. असे अनेक आजार आहेत ज्यांच्यावर उपचार करण्यासाठी घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करता येतो. अशाच आरोग्याच्या तेरा समस्यांवर असलेले घरगुती रामबाण उपाय आपण जाणून घेणार आहोत.

मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीचा त्रास होत असल्यास पुदिन्याची ताजी पाने पाण्यात उकडून मिंट टी तयार करून तो प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. सोप साखरेसोबत वाटून घ्या. झोपताना सुमारे ५ ग्रॅम चूर्ण हलक्या कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे पोटाच्या समस्या व मलावरोध राहणार नाही. तसेच चक्कर येत असल्यास अर्धा ग्लास पाण्यात दोन लवंग टाकून ते उकळावे. नंतर हे पाणी थंड करून प्यावे, आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे लिंबू रस प्यावा. डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी देशी गुलाबाच्या ९-१० पाकळ्या एक ग्लास पाण्यात काही तासांसाठी भिजवून ठेवा. या पाण्याने नियमितपणे डोळे धुतल्याने थकवा दूर होतो.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा जिरे खाल्ल्याने नजर चांगली होते. तसेच रक्तदाबाची पातळीही नियंत्रित राहते. डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसून घ्या. असे लागोपाठ केल्याने जळजळ कमी होईल. डिप्रेशनमध्ये एकाग्रतेची पातळी कमी होते. ही समस्या असल्यास दररोज सकाळी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. यामुळे एकाग्रता वाढते. जर संसर्गामुळे दात दुखत असतील तर लसणाच्या दोन-तीन कच्च्या पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे संसर्ग दूर होऊन वेदनाही कमी होतील. भूक लागत नसेल तर आल्यात बारीक किस करून मीठ मिसळावे. हे मिश्रण आठ दिवस दररोज खावे. याने पोट साफ होईल आणि भूक लागेल.

पोटात गॅस होत असेल तर एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा हळद आणि चिमूटभर सैंधव मिसळून सेवन केल्यास गॅस राहणार नाही. मुलांच्या आहारात दररोज एका गाजराचा अवश्य समावेश केल्यास त्यांचा मेंदू तल्लख राहील. तसेच शारीरिक व मानसिक विकासही चांगला होईल. चेहऱ्यावर तारुण्यपीटिका असल्यास त्यावर अंड्यातील पांढरा भाग लावावा. यामुळे तारुण्यपीटिका लवकर वाळतील आणि डागही राहणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु