नैराश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खेळा ‘व्हिडिओ गेम’, ‘ही’ आहेत कारणे

नैराश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खेळा ‘व्हिडिओ गेम’, ‘ही’ आहेत कारणे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या मानसिक ताणतणाव, नैराश्य हे प्रकार वाढत चालले आहेत. नैराश्यावर नियंत्रण मिळवण्यात अयशस्वी झालेले काही लोक आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलतात. अशा घटनांचे प्रमाणही अलिकडे वाढले आहे. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय असून ते केल्यास या गर्तेतून बाहेर पडणे सोपे आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधनातून एक प्रभावी उपाय शोधून काढला असून त्याची माहिती आपण घेणार आहोत.

काय सांगतात संशोधक

१) जैविक कारणांमुळे घडत असलेले मानसिक बदल हे नैराश्याचे मुख्य कारण असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले

२) शास्त्रज्ञांनी व्हिडिओ गेमवर आधारित अ‍ॅपने नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींच्या मेंदूला प्रशिक्षण दिले. यानंतर त्यांच्या नैराश्येवर नियंत्रण मिळवता येत असल्याचे आढळले.

३) सावधगिरीने तयार करण्यात आलेले प्रेरक संदेशाच्या उपयोगातून नवा संदेश मिळतो. हा संदेश मानसिक आरोग्यासाठी व्हिडिओ गेम अधिकाधिक व्यवहारी पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो.

४) नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेमच्या वापराचा प्रभाव तात्विक आहे. त्यातून दीर्घकालिन परिणाम साध्य होत नसल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु