पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे, दिवसभरात अमूक एवढे पाणी प्यावे, जास्त पाणी प्यायल्यास हानी होऊ शकते, असे सल्ले अनेकजण एकमेकांना देत असता. शिवाय जेवताना कधी पाणी प्यावे, जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे याविषयी अनेकदा संदिग्धता आढळून येते. नेमके सत्य काय आहे ? पाणी कधी, किती वेळा प्यावे इत्यादी माहिती असणे जरूरी आहे. याविषयी माहिती आपण घेणार आहोत.

तज्ज्ञ सांगतात की, पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. शिवाय, त्वचाही तजेलदार आणि निरोगी होते. निरोगी जीवनासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पाणी हे शरीराला खूप आवश्यक आहे. पाण्यामुळेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. मात्र, काही जण म्हणतात जेवण करताना पाणी प्यावे. तर काही जण म्हणतात जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे. परंतु आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिऊ नये. अन्न बराच वेळ पोटात राहिले तर शरीराला पोषण जास्त मिळते.

जेवताना जास्त पाणी प्यायल्यास अन्न लगेच पोटात खाली जाते. जेवताना पाणी प्यायचे असल्यास अतिशय थोडे प्यावे. तसेच कोमट पाणी पिणे कधीही चांगले. खूप थंड पाणी पिणे हानीकारक आहे. पाण्यात ओवा टाकून ते उकळून घ्यावे. अन्न पचण्यासाठी यामुळे मदत होते. जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. निरोगी राहण्यासाठी पाणी ही देवाने आपल्याला दिलेली देणगी आहे. या देणगीचा पूर्ण वापर आपण करून घेतला पाहिजे. पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने होते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिल्याने पोट साफ होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु