पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !

पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  नियमित चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील लोक हा व्यायाम अगदी सहजपणे करू शकतात. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. तसेच आजारी पडण्याची शक्यता खुप कमी होते. अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित अहवालानुसार चालण्याचे कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ या व्यायामासाठी एकही पैसा खर्च करावा लागत नाही.
२ प्रशिक्षणाची गरज नसते.
३ शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
४ दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो.
५ पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
६ झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते.
७ ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी होते.
८ फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
९ पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
१० चयापचय सुधारते.
११ अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
१२ हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
१३ कंबर, मांड्या व पायाचे स्नायू मजबूत होतात.
१४ मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
१५ काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
१६ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
१७ नैराश्याची पातळी खाली येते.
१८ दररोज ३० मिनिटे चालल्यास सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
१९ दीर्घायुष्य लाभते.
२० कोणत्याही वयात हा व्यायाम करु शकता.
२१ आठवड्यातून २ तास चालण्याने ब्रेन स्ट्रोकची शक्यता ३० टक्के कमी होते.
२२ रोज ३० ते ६० मिनिटे चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
२३ रोज ३० ते ४० मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका २९ टक्के कमी होतो.
२४ दिवसातून ३० मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता ३६ टक्के कमी असते.
२५ रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
२६ शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
२७ शरीराला डी जीवनसत्त्व मिळते. हाडे मजबूत होतात.
२८ शारीरिकसह मानसिक व्यायामही होतो.
२९ तन-मनाला आलेला थकवा दूर होतो.
३० तणाव आणि चिडचिडपणा दूर होतो.
३१ झोप चांगली लागते.
३२ मनाची एकाग्रता वाढते.
३३ वजन कमी होते.
३४ शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळतात.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु