‘मान्सून’मध्ये मुलांना सतावणाऱ्या पोटदुखीवर ‘हे’ 4 पदार्थ आहेत ‘रामबाण उपाय’

‘मान्सून’मध्ये मुलांना सतावणाऱ्या पोटदुखीवर ‘हे’ 4 पदार्थ आहेत ‘रामबाण उपाय’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये मुलांना जास्त करून पोटदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. पचनक्रियेबाबत त्यांना अनेक तक्रारी समोर येताना दिसतात. अशात मुलांनी फास्टफूडपासून कटाक्षाने दूर रहायला हवं. आज आपण अशा काही पदार्थांबाबत जाणू घेणार आहोत जे खाल्ल्यानंतर तुम्ही निरोगी रहाल आणि मान्सूनदरम्यानचे आजार तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत.

या पदार्थांमध्ये काही फळांचाही समावेश आहे. या पदार्थांमुळे तुम्हाला पोटदुखीची समस्या उद्भवणार तर नाहीच आणि पोटदुखी वाटत असेल आणि या पदार्थाचे सेवन कराल तर त्यापासूनही आराम मिळण्यास मदत मिळेल.

1) केळी– पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मुलांनी केळी दिली जाऊ शकते. यात इसेंशियल न्यूट्रिएंट्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

2) सफरचंद- तसं पाहिलं तर या ऋतुतही आंबे बाजारात असलेले दिसतात. परंतु मुलांना पोटदुखीचा त्रास सतावू नये यासाठी आंब्यांऐवजी तुम्ही त्यांना सफरचंद खायला देऊ शकता. सफरचंदात आयर्न आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हे फळ पचायलाही सहज असतं.

3) मूग डाळ- बिना तेल आणि मसाल्याने बनलेल्या मूग डाळीची साधी खिचडीही तुम्ही खाऊ शकता. ही पचायला हलकी असते आणि यात पौष्टीक घटकही मोठ्या प्रमाणात असतात.

4) नारळ पाणी- पोटदुखीमध्ये नारळ पाणी पिणं सर्वाधिक फायदेशीर ठरतं. यामुळे बॉडी हायड्रेट राहण्यासाठीही मदत मिळते. परिणामी डिहायड्रेशनपासून शरीराचा बचाव होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु