सूर्यनमस्‍काराच्‍या १२ स्‍टेप्‍समुळे होतात ८ फायदे, कोणी टाळावा ‘हा’ व्‍यायाम

सूर्यनमस्‍काराच्‍या १२ स्‍टेप्‍समुळे होतात ८ फायदे, कोणी टाळावा ‘हा’ व्‍यायाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची सुरवात प्रसन्न होते. यामुळे शरीर निरोगी राहण्यासही मदत होते. सूर्यनमस्कारात क्रमाने केली जाणारी १२ आसने, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात, ताणतणाव कमी करतात. सूर्यनमस्कारामुळे होणारे फायदे जाणून घेवूयात.

शरीराचे आरोग्य
सूर्यनमस्कार ही १२ आसनांची मालिका असून हा एक परिपूर्ण व्‍यायाम आहे. नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीर व मन निरोगी राहते.

पचनशक्ती
सूर्यनमस्कार करताना पोटाजवळील स्नायूंवर ताण येतो. यामुळे पचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठता, अपचन असे पचनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी सकाळी नियमित रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करावेत.

चरबी कमी होते
सूर्यनमस्कारामुळे पोटाजवळील स्नायूंचा व्यायाम होतो. नेहमीच्या वर्कआऊट सोबतच सूर्यनमस्कार केल्याने पोटाजवळील चरबी कमी होते.

रक्त शुद्धीकरण
सूर्यनमस्कार करताना सतत दीर्घश्वसन केल्याने व उच्छश्वास बाहेर सोडल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे रक्त शुद्धीकरण होते.

स्मरणशक्ती
सूर्यनमस्कारामुळे स्मरणशक्ती सुधारते व मज्जासंस्था शांत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारल्याने मनाची अस्थिरता कमी होण्यास मदत होते.

लवचिकता
सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम असल्याने तो नियमित केल्यास शरीर निरोगी व लवचिक बनते.

मासिक पाळी
अनियमित मासिकपाळीची समस्या असलेल्या स्त्रियांनी नियमित सूर्यनमस्कार केल्यास या समस्येतून आराम मिळतो. सूर्यनमस्कारामुळे गर्भारपणानंतर प्रसुती सुलभ होण्यास मदत होते.

तारूण्य
सूर्यनमस्कारामुळे त्वचेची कांती सुधारते तसेच वृद्धपकाळातील सुरकुत्यांपासून सुटका होते. या व्यायामप्रकारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो परिणामी सौंदर्य सुधारण्यास मदत होते.

कोणी टाळावा हा व्‍यायाम
गर्भारपणातील पहिल्या तीन महिन्यानंतर गर्भवती स्त्रीने सूर्यनमस्कार करणे टाळावे. हर्नियाग्रस्त किंवा उच्चरक्तदाबाची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करू नये. मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रिया तसेच मुलींनी सूर्यनमस्कार टाळावा. पाठदुखीची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु