‘या’ तेलांचा वापर केल्यास होतील आरोग्याचे अनेक फायदे

‘या’ तेलांचा वापर केल्यास होतील आरोग्याचे अनेक फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात विविध प्रकारच्या तेलांना खूप महत्व आहे. हजारो वर्षांपासून तेलांचा वापर आरोग्यासाठी आवर्जून केला जात होतो. बियांपासून तेल काढण्याची पद्धतीसुद्धा तेव्हापासून प्रचलित आहे. औषधी बियांचे तेल काढून त्याचा आहारात अथवा अन्य पद्धतीने वापर केला जातो. शरीरात स्निग्धता कायम राखण्यासाठी तेलाची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येकजण विविध मार्गाने दररोज तेलाचा वापर करतो. यामुळे आरोग्यावर चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात. परंतु, तेलांचा योग्य प्रमाणात केलेला वापर नेहमी चांगलेच परिणाम देत असतो.
याच तेलांविषयी आपण माहिती घेणार असून त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घेणार आहोत.

खोबरेल तेल
हे मध्यम प्रकृतीचे तेल असून त्याचा वापर बेकिंगसाठी केला जातो. हे तेल जीवाणू-विषाणूरोधक असल्याने आरोग्यासाठी लाभदायक आहे.

तिळाचे तेल
हे तेल मध्यम प्रकृतीचे असून त्याचा वापर तळणासाठी व सॅलडमध्ये केला जातो. यामध्ये भरपूर ई जीवनसत्त्व, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशिर आहे.

आक्रोड तेल
हे तेल मध्यम प्रकृतीचे असून याचा वापर सॅलड आणि भाज्यांमध्ये केला जातो. आरोग्यासाठी ते लाभदायक असून यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३, स्निग्धाम्ले असतात.

बदाम तेल
हे तेल उष्ण प्रकृतीचे असून त्याचा वापर बेकिंग किंवा तळण्यासाठी केला जातो. ते आरोग्यासाठी लाभकारकअसून ते ओमेगा ३ चा स्रोत आहे.

साजूक तूप
हे उष्ण प्रकृतीचे असून त्याचा वापर विविध पदार्थ बनविण्यासाठी आणि औषधांमध्येही केला जातो. त्याचा स्वाद उत्तम असल्याने पदार्थ चविष्ट होतात. आरोग्यासाठी साजूक तूप लाभदायक असून त्याच्या सेवनाने पचनशक्ती वाढते.

जवसाचे तेल
हे फार उष्ण प्रकृतीचे नसून त्याचा वापर सॅलड किंवा इतर भाज्यांसाठी केला जातो. आरोग्यासाठी उत्तम असून ते ओमेगा ३ चा मोठा स्रोत आहे.

जैतून तेल
हे मध्यम प्रकृतीचे तेल असून याचा वापर सॅलड, पदार्थ शिजवण्यासाठी केला जातो. आरोग्यासाठी हे लाभदायक असून यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

शेंगदाणा तेल
हे मध्यम प्रकृतीचे तेल असून याचा वापर तळण किंवा भाज्या करण्यासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो. आरोग्यसाठी हे लाभदायक असून आजारांत प्रतिरोधक म्हणून याचा वापर केला जातो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु