आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सॅलड अथवा ज्यूसच्या स्वरूपात मुळ्याचे सेवन करता येते. मुळा हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो. कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो. मुळा व त्याच्या पानांची भाजी करून खाल्ल्यास कावीळ हा आजार बरा होण्यास मदत होते.

मुळा वजन कमी करण्यात साहाय्यक ठरतो. आहारात मुळ्याचा समावेश केल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्यापासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही नसतो. मुळ्यात जखम स्वच्छ करण्याची क्षमता असते. यामुळे मूत्रपिंडाची कार्यप्रणाली चांगली राहते. रक्तातील विषारी घटक मुळ्याच्या मदतीने शरीराबाहेर फेकणे सोपे होते आणि मूत्रपिंड संसर्गापासूनही बचाव होतो. मधमाशी वा गांधीलमाशी चावलेल्या जागेवर मुळ्याचा रस लावल्यास सूज व वेदना कमी होतात.

ज्या लोकांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, तर त्यांनी मुळ्याचे सेवन कच्च्या स्वरूपात करावे. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे. मूत्राशयासंबंधी समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो. मुळ्याचा रस घेतल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबते. मुळ्याच्या सेवनाने मूत्रविकार व मूत्रपिंडाशी निगडित संसर्गाचा धोका कमी होतो. आतडे, मूत्रपिंड आणि पोटाशी निगडित रोगांची शक्यताही दूर होते. त्वचेसाठीही वरदान आहे. मुळ्यात असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, झिंक व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात. यामध्ये भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही. अशाप्रकारे मुळा आरोग्यासाठी खुपच गुणकारी असल्याने त्याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु