चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : प्राचीन काळापासून हळदीचा विविध कारणांसाठी वापर केला जात आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्व आहे. हळदीत असलेले कक्र्युमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून बचाव करतात. हळदीला दुसऱ्या औषधी पदार्थांमध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात.अर्धा चमचा हळद अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

तसेच अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरड्यांची मालिश केल्यास हिरड्या मजबूत होतात. अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिसळून दात घासल्याने दात चमकतात. सर्दी-पडसे, ताप यावर सुद्धा हळद गुणकारी आहे. एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खावे. तसेच जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्टेरियलचे काम करते. जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावावे.
हळदीचे दूध नियमित प्यायल्यास आरोग्यासाठी खूप चांगले आहे. घशात वेदना होत असल्यास एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमुटभर मीठ मिसळून गुळण्या कराव्यात.त्वचारोगावर उपचार करण्यासाठी एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून त्वचारोगावर नियमित लावावे. सांधेदुखी असल्यास अर्धा चमचा हळदीमध्ये दोन चमचे अद्रकचा रस मिसळून गरम करावे. हे वेदनेच्या ठिकाणी लावावे. तसेच खोकला असल्यास अर्धा चमचा हळदीमध्ये पाच मिरे बारीक करून मिसळावेत. हे मिश्रण कोमट दुधासोबत घ्यावे. यामध्ये मध सुद्धा टाकल्यास आणखी फायदा होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु