‘तणाव’ मुक्त आणि ‘निवांत’ झोपेसाठी करून पाहा ‘हे’ अचूक उपाय

‘तणाव’ मुक्त आणि ‘निवांत’ झोपेसाठी करून पाहा ‘हे’ अचूक उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या जगात अनेकांना झोपेसाठी वेळ कमी पडत आहे. कमी झोपेमुळे आरोग्यावर वाईट प्रभाव पडत असून यामुळे ब्लडप्रेशर, तणाव, डोकेदुखी, हृदयविकार अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीची निवांत झोप मेंदूसाठी खूप आवश्यक असते. निवांत झोप हार्मोन संतुलनासाठी आवश्यक असते. चांगली भूक लागणे, तहान लागणे आवश्यक असते, त्याप्रमाणेच झोप येणे सुद्धा महत्वाचे आहे. झोप चांगली लागल्यास काम करण्याची इच्छा वाढते. मन प्रसन्न होऊन कामामध्ये लक्ष लागते.

ही काळजी घ्या
* झोप
आणि कॅफिनाचा मोठा संबंध आहे. रात्री झोपण्याच्या एक ते दोन तास आधी चहा-कॉफीचे सेवन करू नये. कॅफिन हे कॉफीसह चहामध्येही असते.

* रात्रीचा आहार कमी करावा. जास्त खाल्ल्याने पचनतंत्रावर ताण पडतो. झोपण्याच्या एक-दीड तास अगोदर हलके अन्न घेतल्यास शांत झोप लागते. पाणी कमी प्रमाणात प्यावे, ज्यामुळे रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणार नाही.

* दिवसभर केलेल्या कामाच्या तणावामुळे झोप येणार नाही, अशी भिती वाटत असते. यामुळे रात्री वारंवार झोप मोडते. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक तणाव चांगल्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करतो. यासाठी जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य, पती, पत्नीशी याविषयी चर्चा करा. यामुळे मानसिक स्थिती बदलेल.

* झोपताना कोणताही विचार करू नका. जास्त वेळ टी. व्ही. पाहणे टाळावे. दुपारी झोपू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु