अपचनापासून ते मुरूम दूर कारण्यासाठी ‘पपई’ फायदेशिर 

अपचनापासून ते मुरूम दूर कारण्यासाठी ‘पपई’ फायदेशिर 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पपई हे सर्व फळांमध्ये उपयुक्त मानले जाते. अपचनापासून  ते चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी पपई फायदेमंद असते. यामध्ये असणाऱ्या पेप्सीन घटकामुळे अन्न पचण्यास मदत होते. पपईमध्ये बीटा कॅरोटीन , बल्की लायकोपिन जास्त प्रमाणात आढळते.

पपईचे आरोग्यसाठी फायदे 

– पपईमध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून बचाव करते. यामुळे हृदयासंबंधी होणारा धोका कमी होतो. पपईमध्ये फायबरची मात्रा  ही जास्त असल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यात मदत होते.

– पपईमध्ये पपाईन नावाचा घटक असतो .जे अन्न पचविण्यास मदत करतो .ज्या लोकांना कब्जची समस्या आहे त्या लोकांनी दिवसातून एकदा तरी पपई खावी. त्यातून व्हिटॅमिन B ही भरपूर मिळते. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात.

– यामध्ये व्हिटॅमिन A घटक असतो. जे डोळ्यांसाठी चांगले असते .पपई रोजच्या आहारात घेतल्याने दृष्टी  तेज होते.  याव्यतिरिक्त पपईमध्ये कॅल्शियम आणि पोट्याशियम जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांना याचा चांगला फायदा होतो.

– पपईच्या पानांचा रस डेंग्यू च्या उपचारासाठी लाभदायक असते. या पानांच्या रसाचा सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यात मदत होते.

– पपई  खाल्ल्याने  हाडे मजबूत राहतात आणि हाडांच्या वेदना कमी होण्यास ही  मदत होते . पपईमध्ये प्रोटीन फायबर आणि आयर्नचे प्रमाण जास्त असल्याने अशक्तपणाही दूर होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु