‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !

‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणा ही आजकाल सर्वसामान्य समस्या झाली आहे. त्यामुळे वजन कमी करण्याकडे अनेक लोकांचा कल वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी मिळेल तिथून माहिती घेऊन, त्याची शहानिशा, खात्री न करता वजन कमी करण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले जातात. मात्र एवढे करूनही वजन कमी होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे वजन कमी करण्याबाबत मिळालेली चुकीची माहिती किंवा गैरसमज. जाणून घेऊयात वजन कमी करण्याच्या बाबतीत कोणकोणते गैरसमज रूढ झाले आहेत.

१) फक्त डाएट करून वजन कमी करता येत. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. डाएट करून कमी झालेलं वजन पटकन वाढतही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएटबरोबर व्यायाम हा हवाच.

२) काही लोक केवळ फळेच खातात. केवळ फळे खाऊन व्यायाम कमी होत नाही. संतुलित आहार आणि व्यायामाखेरीज वजन कमी झालं तरी ते जास्त दिवस टिकत नाही.

३) वजन कमी करण्यासाठी चरबी घटली पाहिजे. त्यासाठी काही लोक कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात घेतात आणि प्रोटिन्सयुक्त आहार जास्त घेतात. मात्र प्रोटीन्स, कार्ब्स आणि चांगले फॅट्स यांच्या संतुलनातूनच वजन कमी होईल.

४) काही लोक वजन कमी करण्यासाठी कमी जेवण करतात. मात्र प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. पुरेसं जेवण केलंच पाहिजे. कमी खाण्यानेही वजन वाढू शकत.

५) पुस्तकं वाचून आणि इंटरनेटवर वेगवेगळी डाएटस बघून आपण वजन सहज कमी करू शकतो असे अनेकांना वाटते. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहार यांचं योग्य संतुलन हवं. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

६) भात खाणे सोडलं की वजन कमी होते.

७) जिममधल्या व्यायामाने सांधेदुखी होते. प्रत्यक्षात व्यायामाचा आणि हाडांच्या दुखण्याचा संबंध नाही.

८) ग्रीन टी, भाज्यांचे किंवा फळांचे ज्युस घेतल्याने वजन कमी होते.

९) वजन कमी करायचं आहे, तर जिममध्ये जाणे आणि ‘प्रोटीन पावडर’ घेणे आवश्यकच आहे असाही गैरसमज अनेकांच्या मनात असतो. प्रोटीन पावडर घेण्यापूर्वी आहारतज्ज्ञांना सल्ला अवश्य घ्या.

१०) वजन कमी करण्यासाठी अनेक जण आहारातून तेल-तूप वर्ज्य करतात. मात्र रोजच्या आहारातून शरीराला कमीतकमी १५ ग्रॅम तेल मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात तेल- तूप घेतलंच पाहिजे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु