पोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे

पोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोटाच्या मालिशचा प्रयोग प्राचीन काळापासून केला जात आहे. परंतु पोटाच्या मालिशने आरोग्याचे कोणते फायदे होतात, याविषयी जास्त लोकांना माहीत नाही. पोटाची मालीश केल्याने जीवन आरोग्यदायी होऊ शकते. ही मालिश करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

अशी करा मसाज
पोटाची मसाज करण्याअगोदर पाठीवर सरळ झोपा. यानंतर हाताला तेल लावा आणि पोटाला लावा. मसाज करताना ओला हात फिरवून ३० ते ४० वेळा मसाज करा. मालिशची जाणिव होऊ द्या. मेंदु शांत करुन आपले सर्व लक्ष मालिशवर द्या. आठवडाभर जर ही ३ मिनटाची मसाज केली तर पोटासंबंधीत आजार दूर होतील.

हे फायदे होतील

* पोटाची मालिश केल्याने पचनक्रीया वाढते. जे लोक वजन कमी करु इच्छिता आणि त्यांचे वजन अनेक उपाय करुनही कमी होत नाही. त्यांच्यासाठी हे खुप फायदेशीर आहे.

* अन्न योग्य प्रकारे पचन होत नसल्यामुळे पोट फुगणे आणि गॅस होण्याची समस्या होते. परंतु पोटाची मालिश केल्यावर पोटाच गॅस होत नाही आणि पचन क्रीया चांगली राहते.

* बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रोज पोटाची मालिश करा. यामुळे तुमचे पोट नेहमी साफ राहील.

* पोटात वेदना होत असतील तर मालिश केल्याने त्या जागेवरील ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे पोटाच्या मासपेश्यांना उष्णता मिळते. असे झाल्याने तुम्हाला आराम मिळतो.

* मालिश केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदू पुर्णपणे शांत होतो. खुप रिलॅस्क फिल होते. यामुळे मानसिक चैतन्य मिळते.

* नियमित पोटाची मालिश केल्याने कधीच कोणत्याच प्रकारचा पोटाचा आजार होत नाही. पोट फुगने, पोट दुखी, गॅस अशा समस्या दूर होतात. पोटाच्या मासपेश्या पुर्णपणे टोन्ड होऊ जातात. सोबतच तुमची अपचणाची समस्या दूर होते.

* पोटाची मालिश केल्याने तेथील मासपेशी टोन्ड होतात. वाढलेली कंबर काही दिवसात शेपमध्ये येईल. यासोबतच टम्मी टाइट बनेल.

* मालिश करतांना लवंग, लेवेंडर किंवा दालचीनीचा वापर केल्याने पीरियड्सच्या वेदनांपासुन सुटका होते.

* प्रेग्नेंट असल्यास, किडनी स्टोन, गॉलस्टोन, पोटात अल्सर, प्रजनन अंगांमध्ये सूज किंवा आंतरिक रक्तस्त्राव होत असेल तर मालिश करु नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु