बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बीटचा ज्यूस तसेच सलाडमधून बीट नियमित सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते. यातील अँटीऑक्सिडेंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. बीटमध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. तसेच सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीनसह अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात. बीटच्या सेवनाने हिमोग्लोबिन सुद्धा वाढते.

तज्ज्ञांचा सल्ला
काही हर्बल तज्ज्ञ कॅन्सरसारख्या मोठ्या आजारातही रुग्णांना बीट खाण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञ सांगतात की, कॅन्सर नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट उपयोगी आहे. तसेच आधुनिक संशोधनामध्येही बीट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले गेले आहे. यातील लाल रंगाचे बेटाईन रसायन कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृद्धी रोखते.

थंडीताप
थंडीतापाच्या आजारात बीट उपुयक्त आहे. यातील नैसर्गिक साखर शरीराला तत्काळ ऊर्जा देते. पांढरे बीट पाण्यात उकडावे. हे पाणी थंड करून घेतल्यास फोड, जळजळ दूर होते.

किडनी विकार
किडनी आणि पित्ताशयाच्या आजारात बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित घेतल्यास चांगला फरक पडतो. बीट ज्युस मुळे रक्तवाहिन्यांना सक्रीय होतात. कार्यशीलता, चपळता बीट ज्यूसमुळे वाढते.

हृदयरोग, अपचन
हृदयरोगाच्या रुग्णांनी दररोज दोन कच्च्या बीटचे सेवन केल्यास हार्टअ‍ॅटॅक येण्याची शक्यता कमी होते. तसेच अपचन होण्याचा त्रास असेल तर आदिवासी लोक कच्चे बीट खाण्याचा सल्ला देतात. कच्चे बीट खाल्ल्याने शरीराला पर्याप्त मात्रामध्ये फायबर मिळते जे पाचन क्रिया संतुलित करून अपचनाची समस्या दूर करण्यात उपयुक्त आहे.

लठ्ठपणा
वजन कमी करण्यासाठी बीटचा चांगला उपयोग होतो. कच्चे बीट किंवा कमीतकमी २ बीटचे ज्यूस दररोज उपाशी पोटी पिल्यास वजन कमी होते.

रक्तदाब
बीट ज्युसमध्ये आढळणारा नाईट्रेट रक्तदाब कमी करतो. हाय ब्लड प्रेशर असणारांसाठी बीट ज्युस वरदान आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु