ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या अनेकजण कोणत्या न कोणत्या कामासाठी तासन तास खुर्चीवर बसलेले असतात. कामाच्या व्यापात त्यांचा खुर्चीवर खूप वेळ जातो. पण हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे तुम्हाला जर ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसावं लागत असेल तर तुम्ही अगोदर तुमच्या काही सवयी बदल नाहीतर तुम्हाला कमरेच्या आणि पाठीच्या आजरांचा सामना करावा लागेल.

ऑफिसमध्ये आपल्याला शारीरिक कसरत करावी लागत नाही. त्यामुळे आपल्या कामाचा आपल्या स्वाथ्यावर परिणाम होतो. आणि काही संशोधनातून हे समोर आलं आहे की, खुर्चीवर जास्त वेळ घालवला तर अनेक आजारांना आमंत्रण मिळत.

बदला या सवयी :

१) आपण ऑफिसमध्ये तासनतास खुर्चीवर बसून जातो. त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या कमरेवर होतो. त्यामुळे खुर्चीवर बसताना सरळ बसा. टेकून बसले तर तुम्हाला त्रास होईल.

२) ऑफिसमध्ये खुर्चीवर बसले असताना दर १ तासाला खुर्चीवरून उठा. आणि थोडे उभे रहा. किंवा इकडे तिकडे थोडे फिरा. त्यामुळे तुमच्या स्नायूची हालचाल होईल.

३) आपण ऑफिसमध्ये अनेकदा आपल्या सहकाऱ्यांशी बोलायचं असेल तर मेल करतो. पण असे करण्याऐवजी त्यांच्या जवळ जाऊन बोला. आणि मग जागेवर येऊन मेल करा. असे केल्यास तुमच्या पाठीचा ताण कमी होईल.

४) अनेकांना सवय असते ती म्हणजे काम करत असताना टाईम पास नको म्हणून ते चहा, कॉफी जागेवर मागून घेतात. पण तस करू नका. चहा पिण्यासाठी कॅन्टींगमध्ये जा. त्यामुळे तुमच्या शरीराची स्थिती चांगली राहील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु