औषधी आहे गुलाबाचे फुल, अशाप्रकारे खाल्ल्यास ‘या’ आजारांमध्ये मिळेल आराम

औषधी आहे गुलाबाचे फुल, अशाप्रकारे खाल्ल्यास ‘या’ आजारांमध्ये मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गुलाबाचे फुल त्याचे सौंदर्य आणि सुगंधासाठी ओळखले जाते. तसेच त्यामध्ये औषधी गुणधर्मही भरपूर आहेत. गुलाबाच्या फुलामध्ये विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता आहे. गुलाबाच्या फुलाचे काही खास उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे

गुलाबाच्या गुलकंदमुळे शरीराला थंडावा मिळतो. हे शरीर हायड्रेट आणि ताजेतवाने ठेवते. हे स्फूर्ती देणारे शीतल टॉनिक आहे. यामुळे थकवा, आळस, मासपेशींमधील वेदना दूर होतात.

अर्जुन वृक्षाची साल आणि देशी गुलाब पाण्यामध्ये एकत्र उकळून घ्या. हा काढा दररोज पिल्यास हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात.

गुलकंदमध्ये सी, ई आणि बी व्हिटॅमिनचे भरपूर प्रमाण असते. जेवण केल्यानंतर गुलकंद खाल्ल्यास पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतील.

गुलकंदामध्ये चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

डाग, मुरूमं गुलकंदाचे सेवन केल्यास दूर होतात. अतिउष्णतेमुळे शरीरावर आलेले फोड कमी होतात.

डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यात धूळ गेल्यामुळे त्रास होत असेल तर गुलाब पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळेल.

गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून याचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळेल.

रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा गुलकंद खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होईल.

झोप येत नसेल किंवा तणावग्रस्त असाल तर रात्री डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपा. अनिद्रेची समस्या दूर होईल.

१० गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि पायरिया रोगातून मुक्ती मिळते.

११ गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. गुलकंद दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. दररोज एक गुलाब खाल्ल्यास टी.बी रुग्णाला लवकर आराम मिळेल.

१२ गुलाबाची पाने ग्लिसरीन टाकून बारीक करून हे मिश्रण ओठांना लावल्यास ओठ गुलाबी आणि कोमल होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु