सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार

सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फक्त पंधरा मिनिटे पोहण्याचा व्यायाम केला तरी शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. हा एक सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. यामुळे शरीराची कार्यक्षमताही वाढते. अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. पोहण्याच्या व्यायामाचे कोणते फायदे आहेत, याबाबत माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे 

दमा
नियमित पंधरा मिनिटे पोहल्यास फुप्फुसाचा चांगला व्यायाम होतो. दम्याची समस्या नियंत्रित होते.

इन्सोमनिया
मेंदू रिलॅक्स होतो. यामुळे इन्सोमनिया म्हणजेच झोप न येण्याची समस्या दूर होतो.

लठ्ठपणा
शरीरातील मेद व चरबीचे विघटन जलदगतीने होते. यामुळे लठ्ठपणा दूर होतो.

मानसिक तणाव
या व्यायामामुळे मूड फ्रेश होतो. मेंदू रिलॅक्स झाल्याने डिप्रेशनची समस्या नियंत्रणात राहते.

उच्च रक्तदाब
रक्ताभिसरण क्रिया सुधारल्याने उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येते.

संधिवात
स्नायू मजबूत झाल्याने संधिवातात आराम मिळू शकतो.

हृदयरोग
नियमित पंधरा मिनिटे पोहल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते. हृदयाला योग्य रक्तपुरवठा झाल्याने हृदयरोगाची शक्यता कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु