‘या’ 5 गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या

‘या’ 5 गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण जर चांगला आहार घेतला तर आपण आपले आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतो. हे प्राचीन भारतीय लोक जाणून होते. त्यामुळे चांगला आहार घेण्याचे काही नियम आहेत. ते नियम जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात पाळले तर आपल्या आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारी म्हणजे केस गळणे, थकवा, त्वचेवर डाग, फोड येणे, आळस, पोट कायम बिघडणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगदुखी अश्या तक्रारी हद्दपार होतील. सगळं खाऊनही वजन न वाढणे किंवा कमी खाऊनही सतत वजन वाढणे याचा अर्थ, कदाचित तुम्ही विरुद्ध अन्न खात असाल. त्यामुळे आपण आपल्या आहारात जर कोणत्या गोष्टीचा समावेश करायचा. हे आपण आज जाणून घेवू.

१) दही –

दह्याबरोबर तुम्ही कधीच फळे खाऊ नका. त्यामुळे कफाचा उद्रेक होतो, कफ फुफ्फुसात जाऊन बसतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. दही आणि उडीद एकत्र खाणे खुप घातक आहे, त्याने अचानक रक्तदाब वाढतो, हृदयविकार होतात. त्यामुळे दहिवडे खाणे आरोग्याला अतिशय घातक आहे.

Image result for दही
२) तूप –

सगळ्यात पौष्टिक समजले जाणारे तूप हे आपल्यासाठी वरदान आहे.  पण तूप हे तांब्याच्या भांड्यात कधीही ठेवू नये.  यामुळे तूप विषारी होते, तसेच तूप आणि मध समप्रमाणात घेतल्यास विष तयार होते.

Related image

३) टोमॅटो आणि काकडी –

टोमॅटो व काकडीची एकत्र कोशिंबीर करणे काही शहाणपणाचे नाही.  त्यामुळे पोट फुगते गॅसही तयार होतात. त्यामुळे टोमॅटो आणि काकडी कधीच सोबत खाऊ नये.

Image result for टोमॅटो आणि काकडी

४) दूध –

दुधात जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. त्याबरोबर असे काही पदार्थ खाणे टाळावे ज्यामुळे त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार होतात. दुधाबरोबर कधीही अंडे, मांस, कांदा, केळ, नमकीन फरसाण, आंबट फळे, मुळा, फणस, वांगी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांना बिलकुल पचू देत नाहीत.

Image result for दूध
५) मांसाहार –

मांसाहार करताना बरोबर दूध, दही, चीझ, मोड आलेले पदार्थ, बटाटा, स्टार्च इत्यादी टाळावे, तसेच मांसाहारी पदार्थ तिळाच्या तेलात बनवू नये. नॉनव्हेज बर्गर बरोबर फ्रेंच फ्राईज हे घातक ठरते.

‘या’ 5 गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु