‘या’ ६ संकेतावरून समजू शकते…हृदयविकाराचा झटका येतोय, जाणून घ्या

‘या’ ६ संकेतावरून समजू शकते…हृदयविकाराचा झटका येतोय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपले शरीर प्रत्येक गोष्टींचे संकेत देत असते. मात्र, हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. जर हे संकेत स्वत:ला अथवा अन्य व्यक्तीला ओळखता आले तर वेळीच उपचार केल्याने जीवनदान मिळू शकते. शरीराच्या काही संकेतावरून हृदयविकाराचा झटका आल्याचे समजू शकते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तीन तासाच्या आत योग्य उपचार मिळाले तर त्या व्यक्तीची तब्येत सुधारण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका येत असल्याचे कसे ओळखावे, हे जाणून घेवूयात.

हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत

१) हृदयविकराचा झटका आल्यास डाव हात, पाय, चेहऱ्याची डावी बाजू यांच्यात असलेली सगळी ताकद निघून जाते.

२) बोलताना अडखळल्यासारखे वाटते.

३) समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजण्यास खूपच त्रास होता.

४) शरीराची एक बाजू लुळी पडल्यासारखी वाटते.

५) एका किंवा दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थितपणे दिसत नाही.

६) चक्कर येते. मळमळल्यासारखे होते.

हे नेहमी लक्षात ठेवा

  • वरील लक्षणे दिसली तर तातडीने उपचार घेण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा. अशा व्यक्तीला तातडीने रूग्णालयात न्या.
  • तत्पूर्वी संबंधित व्यक्तीला हसायला सांगा. हृदयविकाराचा झटका आला असल्यास या व्यक्तीला हसता येणार नाही.
  • अशा व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. बोलताना साधे शब्द बोलायला देखील त्याला त्रास होत असल्यास त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे.
  • त्या व्यक्तीला हात उंचवायला सांगा त्याचा हात त्याला उचलता येत नसेल त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे.
  • रुग्णायलात पोहोचण्याच्याआधीच डॉक्टरांना त्याची कल्पना देऊ शकता. व्यक्ती रुग्णायलात पोहोचण्यापूर्वी तुम्हाला काही उपाय डॉक्टर सांगू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु