चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या

चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्या-उठल्या अनेकांना चहा प्यायची समय असते. अशा प्रकारे चुकीच्या वेळी चहा घेणे घातक ठरू शकते. चहामध्ये जास्त प्रमाणात असलेल्या टॅनिनचा शरीरावर अतियश वाईट परिणाम होत असतो. चहा जास्त उकळून पिणे हे सुद्धा हानिकारक असते. मात्र, रोज ग्रीन टी घेतल्यास अनेक फायदे होतात. चहा पिण्याच्या दुष्परिणामांविषयी आपण जाणून घेवूयात.

जेवणानंतर चहा
जेवणानंतर लगेच चहा प्यायला तर जेवणातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरापर्यंत पोहोचत नाही. यामुळे इनडायजेशन होते.

झोपण्यापुर्वी
झोपण्यापुर्वी चहा प्यायल्याने झोप न येण्याची समस्या होते.

जास्त पिणे
जास्त चहा प्यायल्याने शरीराला आयर्न आणि कॅल्शियम योग्य प्रकारे मिळत नाही. यामुळे हाडे कमजोर होतात. दिवसातून २ किंवा ३ पेक्षा जास्त वेळा चहा पिऊ नये.

जास्त गरम
चहा तयार केल्याबरोबर लगेच प्यायल्यास पोटाच्या लाइनिंगवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे कँसर होण्याची शक्यता वाढते.

उपाशीपोटी
उपाशीपोटी चहा प्यायला तर यामधील अ‍ॅसिडिक प्रॉपर्टी बॉडीमध्ये अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु