सूर्यप्रकाश व खेळत्या हवेअभावी वेगाने पसरतात टीबीचे जंतू, ‘या’ ७ प्रकारे घ्या काळजी

सूर्यप्रकाश व खेळत्या हवेअभावी वेगाने पसरतात टीबीचे जंतू, ‘या’ ७ प्रकारे घ्या काळजी

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दाटीवाटी, घरात येणारा अपुरा सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेचा अभाव या कारणांमुळे टीबीचे जंतू अधिक वेगाने पसरतात. टीबीला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि उपचार सरकारी पातळीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु, टीबीचा संसर्ग वेगाने होऊ नये, त्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

ही दक्षता घ्यावी
१ घरात पुरेशा सूर्यप्रकाश आला पाहिजे.
२ घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
३ टीबी असलेल्या रुग्णापासून लहान मुलांना दूर ठेवा.
४ रुग्णाच्या थुंकीसाठी वेगळे भांडे ठेवा.
५ रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत त्यास कुटुंबाने मानसिक, आर्थिक आधार द्यावा.
६ नियमित पौष्टिक आहार घ्यावा.
७ व्यायाम, योगासने करावीत.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु