मोबाईलवर जास्त बोलल्याने होऊ शकतो सर्वाइकल पेन, जाणून घ्या १० चूका

मोबाईलवर जास्त बोलल्याने होऊ शकतो सर्वाइकल पेन, जाणून घ्या १० चूका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूकीच्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक आजार वाढत चालले आहेत. यापैकीच एक म्हणजे सर्वाइकल स्पॉंडलाइटिस होय. खराब पोश्चर, व्यायामाचा अभाव, जंक फूड, आदी कारणांमुळे मानेत वेदना आणि सर्वाइकल स्पॉडलाइटिस होऊ शकतो. खालील १० चुकांमुळे सर्वाइकल पेन होण्याची शक्यता असते.

कान आणि खांद्याच्यामध्ये मोबाईल धरून जास्त वेळ बोलल्याने सर्वाइकल पेन होऊ शकतो.

जास्त वेळ चारचाकी अथवा दुचाकी वाहन चालविणे.

घरात अथवा कामाच्या ठिकाणी जास्तवेळ मान वाकवून काम केल्यास मान आणि बॅकबोनवर जास्त भार पडतो. यामुळे सुद्धा वेदना होऊ शकतात.

कॉम्प्युटर मॉनिटर डोळ्यांच्या पातळीत नसेल, शरीराची स्थिती योग्य नसेल अथवा खुर्ची योग्य नसल्यास वेदना होऊ शकतात.

झोपून जास्त वेळ टीव्ही पाहणे तसेच वाचन केल्याने मान आणि मणक्याच्या हाडांवर जोर येतो. यामुळे वेदना होऊ शकतात.

सतत बसून राहिल्याने आणि व्यायाम न केल्याने मसल्स स्टीफ होतात, आणि सर्वाइकल पेनची शक्यता वाढते.

पोटावर झोपल्याने, तसेच जास्त कडक अथवा मऊ, उंच उशी घेतल्याने सर्वाइकल पेन होऊ शकतो.

झोपण्यासाठी कडक अथवा मऊ गादीचा वापर केल्यास सर्वाइकल पेनची समस्या होऊ शकते.

बसल्यानंतर पाठ आणि मानेला योग्य आधार मिळत नसल्यास अशा आवस्थेत जास्त वेळ बसल्याने सर्वाइकल पेन होऊ शकते.

१० ताठ उभे राहण्याऐवजी पोक काढून, मान खाली करून, वाकून उभे राहिल्याने सर्वाइकल पेनची शक्यता असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु