हा उपाय करा, रात्री शांत झोप लागेल

हा उपाय करा, रात्री शांत झोप लागेल

आरोग्यनामा ऑनलाइन – शारीरीक आणि मानसिक आरोग्य राखायचे असल्यास व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शारीरीक आरोग्य राखले जातेच शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते. तसेच व्यायामाचा आणि झोपेचाही संबंध यामुळेच आहे. एका संशोधातून हे सिद्ध झाले आहे. शारीरीक श्रम करणारांना शांत झोप लागण्याचे कारण हेच आहे. यासाठी शांत झोप हवी असल्यास नियमित व्यायाम केला पाहिजे.

जे तरूण फिजिक अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतात ते एक्सरसाइज न करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेळ आणि उत्तम पद्धतीने झोप घेतात. यासंबंधी करण्यात आलेल्या संशाधनात तज्ज्ञांना आढळून आले की, ज्या व्यक्ती जास्त परिश्रम करतात, ते रात्री शांत झोप घेतात.
शांत झोप येणे हे तरूणपणी अत्यंत अवघड असते. या काळात क्लासरूम परफॉर्मन्स, ताण आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा झोपेवर परिणाम झालेला असतो. तरूण मुलांना प्रत्येक दिवशी जास्त एक्सरसाइज करण्यासाठी प्रोत्साहित केले तर रात्री त्यांना शांत झोप मिळते.

दिवसभरात जर तरूणांनी काहीही श्रम केले नाहीत तर रात्री त्यांना शांत झोप लागत नाही. संशोधनमध्ये सहभागी झालेले प्रतिस्पर्धी जेव्हा दिवसभरामध्ये जास्त वेळेसाठी निष्क्रिय असतात. ते रात्रीच्या वेळी लवकर झोपतात आणि सकाळी उशीरा उठतात. पण त्यांची झोप पूर्ण होत नाही. म्हणजेच फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटी आणि झोपेमध्ये संबंध असल्याचे स्पष्ट होते. संशाधकांनी या संशोधनासाठी ४१७ लोकांना सहभागी केले होते. जेव्हा या व्यक्ती १५ वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांना एक्सीलेरोमीटर्स देण्यात आले. जे त्यांच्या मनगटावर आणि हिप्सवर बांधण्यात आले होते. जे एक आठवड्यापर्यंत त्यांची फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटी आणि झोप यांच्यावर लक्ष ठेवत होते. सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या वागणूकीबाबत विचारण्याऐवजी त्यांच्या शारीरिक हालचाली आणि झोपेवर लक्ष ठेवण्यात आले होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु