मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मध जवढे गोड असते त्यापेक्षा जास्त वेदनादायी मधमाधीचा दंश असतो. मधमाशी चावल्यानंतर दंश केलेला भाग सूजतो आणि वेदना होतात. ग्रामीण भाग असो की, शहरी, मधमाशींचे पोळे हे सर्वत्र आढळते. उंच उंच इमारतींवर सुद्धा मधमाशा आपले पोळे तयार करतात. डोंगर तसेच जंगलात मधमाशांचे पोळे आढळते. त्यामुळे तुम्ही कुठेही राहणारे असलात तरी मधमाशीचा दंश कधीही होऊ शकतो हे लक्षात ठेवा.

मधमाशांच्या हल्ल्यात माणसांनी प्राण गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मधमाधीचा दंश खूपच वेदनादायी असल्याने हा दंश झालाच तर वेदन कमी करण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घेवूयात. तज्ज्ञांच्या मते, मधमाशी वा गांधीलमाशी चावल्यानंतर सर्वांत आधी चावलेल्या जागेवर क्रेडिट कार्डच्या साहाय्याने दाब तयार करावा. जर त्या जागेवर काटा राहिला असेल तर तो कार्डाच्या मदतीने निघून जाईल. जर काटा तसाच राहिला तर शरीरात विष पसरू लागते. यामुळे व्यक्तीला जास्त वेदना होतात.

अशा स्थितीत व्यक्तीने दंश झालेल्या जागेवर बर्फाच्या तुकड्याने सुमारे १५ ते २० मिनिटे चोळावे. असे केल्याने सूज येणार नाही.बर्फामुळे रक्तप्रवाह मंद होतो आणि सूज येत नाही. चावलेल्या जागेवर लिंबाचा तुकडा चोळल्यानेही सूज येत नाही. त्या जागेवर त्वरित टूथपेस्ट लावावे. तसेच टूथपेस्टमध्ये अल्केलाइन असल्यामुळे विषारी दंशाच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. पपईसुद्धा खूप फायदेशीर आहे. पपईचा छोटासा तुकडा त्या जागेवर लावावा. पपईत असलेल्या पापेन नावाच्या एंझाइम्समुळे विषारी दंशाचा परिणाम कमी होत जातो. मधामध्ये जिवाणूविरोधी घटक असतात. यामध्ये असलेल्या हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे रुग्ण लवकर बरा होतो व वेदनाही कमी होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु