टॉन्सिलायटिस वर करा ‘हे’ घरगुती उपाय

टॉन्सिलायटिस वर करा ‘हे’ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- आपण नेहमीच मोठ-मोठ्या आजारांच्या भीतीपोटी लहान-सहान आजारांकडे दुर्लक्ष करतो. असच दुर्लक्षित केलेला छोटासा वाटणारा आजार म्हणजे टॉन्सिलायटिस. हा आजार टॉन्सिल्समध्ये होणाऱ्या इन्फेक्शनमुळे होतो. जर आपले टॉन्सिल्स मजबूत असतील तर घशात विषाणू प्रवेश करत नाहीत. त्यामुळे सूज येणे किंवा टॉन्सिल्स लाल होणे अशी समस्या उद्भवत नाही. टॉन्सिल्स एकप्रकारे सुरक्षा रक्षकाचे कार्य करतात. टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम महिन्यातुन एक-दोन वेळा किंवा सारखाच झाल्यास हे लक्षण धोक्याचे असू शकते.

टॉन्सिलायटिस दोनप्रकारे होतो एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन दुसरे व्हायरल इन्फेक्शनद्वारे यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन स्टॅफिलोकोकस ऑरियस, यु स्ट्रेप्टोकॉकस होमोफिलस इन्फ्लुएंझा यांसारख्या विषाणूंमुळे होते. तर व्हायरल इन्फेक्शन reovirus, adenovirus, influenza virus या विषाणूंमुळे होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. खूप जास्त गरम खाल्ल्याने किंवा थंड द्रव्यामुळे तर जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही टॉन्सिल्सचा त्रास होतो. प्रदूषण, धूळ यांमुळेही टॉन्सिल्सवर परिणाम होतो.

टॉन्सिल्स होण्याचे लक्षणे :

१) टॉन्सिल्सला सूज येणे.
२) खाण्यापिण्यास त्रास होणे.
३) घश्यात जळजळ होणे.
४) ताप येणे.
५) थकवा जाणवतो.
६) कान दुखणे.
७) आवाजात जडपणा व बोलण्यास त्रास होणे.

टॉन्सिल्सवर घरगुती उपाय :

सर्वप्रथम टॉन्सिल्सचे दुखणे घालवण्यासाठी दिवसभर विश्रांती घेणे तसेच दिवसातून २ ते ३ वेळा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे आवश्यक आहे.

तुळसीची पाने, काळी मिरी आणि अद्रक पाण्यात उकळून त्याचा रस पिणे किंवा आपल्या गरजेनुसार साखर व चहापत्ती टाकून उकळू शकता. हे पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो.

अर्धा चमचा हळद पावडर एक ग्लास गरम दुधात मिसळवून ते दूध पिणे यामुळे इन्फेक्शन होत नाही. रोज रात्री हे करावे.

मूलेठीचे चूर्ण आणि मध मिक्स करून रोज रात्री एक चमचा घ्या यामुळे लवकरात लवकर टॉन्सिल्सच्या त्रासापासून सुटका होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु