स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – विसराळूपणा हा कधी-कधी खूपच घातक ठरू शकतो. कामाचा ताण आणि इतर ताणतणावात काही गोष्टी विसरून जाणे सामान्य असले तरी हे सतत होत राहिल्यास त्रासदायक आहे. विसराळूपणा हा सर्वच वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत दिसून येतो. एखादी गोष्ट विसरण्या पाठीमागचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता कमी असणे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला सतत सक्रिय ठेवले पाहिजे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही घरगुती रामबाण उपाय असून ते केल्यास ही समस्या कायमची बंद होऊ शकते.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रोज एका सफरचंद खावे. यामुळे स्मरण शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच बडिशोप आणि मिश्री यांची पाउडर चाळून दोन छोटे चमचे दुधात टाकून प्यावी. अक्रोड स्मरणशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. रोज अक्रोड आणि त्याचा सोबत १० ग्रॅ. किसमिस खाल्याने देखील फायदा होतो. आणखी एक उपाय म्हणजे नऊ बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवावे.

सकाळी त्याचे साल काढून बारीक पाउडर तयार करून गरम दुधात टाकावी. यात तीन चमचे मध टाकावे. अशा प्रकारे सेवन केल्यानंतर कमीत कमी दोन तास काही खाऊ नये. नियमित अलसीच्या तेलाचे सेवन केल्याने मेंदूसंबंधी कुठलेही विकार उद्भवत नाही. आवळ्याचा मुरंब्बा खाल्यानेही विसरणे कमी होते. तसेच ब्रह्मी या जडी-बुटीपासून बनवलेल्या रसाचे एक चमचा सेवन केल्यास खुप चांगला फरक दिसून येतो. ब्रह्मीची सात पाने चावून खाल्याने देखील विसराळूपणावर चांगला गुण येतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु