‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे आहार आणि विहारावर खूप मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. अशाच जीवनशैलीमुळे अनियमित खाणे-पिणे आणि कमी शारीरिक हालचाली होत असल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू लागली आहे. गरजेपेक्षा जास्त जेवण करणे, दारू, सिगारेट आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळेही अ‍ॅसिडिटीसाठीचे प्रमाण वाढत आहे.

मसालेदार जेवण, कॉफी, आंबट फळे, सिगारेट, दारू, चॉकलेट, थंडपेय, टोमॅटो, लोणचे, मसालेदार चटणी, तळलेले पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेले अन्न, तसेच दीर्घकाळ न पचणारे पदार्थ टाळले तर अ‍ॅसिडिटी होणार नाही. या पदार्थांमुळेच अ‍ॅसिडिटी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या पदार्थांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.अ‍ॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर खाण्या-पिण्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. दिवसभरात तीन वेळा पोटभर जेवण करण्याऐवजी सहा वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात खावे. एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये. जेवण केल्यानंतर लगेचच झोपायला जाऊ नये. जेवण आणि झोप यामध्ये तीन तासांचे अंतर ठेवावे.

रात्रीच्या जेवणानंतर थोडे पायी फिरावे. जेवणात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. भाजलेले-तळलेले पदार्थ टाळावेत. रोजच्या जेवणात ३५ टक्के उच्च् फायबरवाल्या धान्यापासून बनलेली भाकर, डाळ, विना पॉलिश केलेले तांदूळ इत्यादी असायला हवेत. त्यानंतर ४० टक्के ताजी फळे आणि भाज्यांचे प्रमाण ठेवावे. रोजच्या आहारामध्ये अंडी, तेल आणि मांस यांचे प्रमाण १५ टक्के असावे. उर्वरित १० टक्क्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थ जसे दही व ताकाचा समावेश करावा. फळांमध्ये पपई, जांभूळ, हाय प्रोटीन फूड, हर्बल चहा, केळी, काकडी, कलिंगड, नारळ पाणी, दूध, भोपळा, गाजर, हिरवा कांदा, गोबी यांचा समावेश असावा. जेवणामध्ये आले, लसूण, कांदा, काळे मिरे, लाल मिरची, हळद आणि सोप यांचा संतुलित प्रमाणात वापर केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु