लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बाळ हे ६ महिन्याचे असताना त्याला दात येण्यास सुरुवात होते. तोपर्यंत त्याचा आहार म्हणजे आईचे दूध असते. दात येत असताना बाळाला त्रास होतो. यावर अनेक घरगुती उपाय असतात. ते जर केले तर बाळाला त्रास कमी होईल. त्यामुळे तुमच्या बाळाला जर दुधी दात येत असतील तर तुम्ही खालील काही घरगुती उपाय करा. यामुळे तुमच्या बाळाला त्रास होणार नाही.

१) दात येत असताना जुलाब, उलट्या, त्वचेवर रॅश, खोकला, ताप वगैरे त्रास होत असेल तर मुलांना साळीच्या लाह्यांची पेज देणे उत्तम असते. आल्या-लिंबाचा रस व मध यांचे मिश्रण थोडे थोडे चाटविण्याचाही उपयोग होतो.

२) मुलांना उलट्या किंवा जुलाब होत असतील तर कुडा, अतिविषा, मुरुडशेंग, नागरमोथा ही द्रव्ये उगाळून तयार केलेली गुटी देणेही चांगले. “संतुलन बाल हर्बल सिरप’ सारखे सिरप घेण्याचाही अशा स्थितीत उत्कृष्ट परिणाम करू शकते.

३) मुलांना नवीन दात निघत असताना ताप जर आला तर नागरमोथा, काकडशिंगी, अतिविषा यांचे पाव चमचा चूर्ण मधासह चाटवता येते. तसेच प्रवाळपंचामृत, कामदुधा गोळी थोड्या प्रमाणात चाटविण्याचाही उपयोग होतो.

४) लहान मुलांना दात निघत असतील तर त्यांना त्रास होतो. यावेळी गुडूची, शतावरी वगैरे रोगप्रतिकारशक्‍ती वाढविणाऱ्या द्रव्यांपासून तयार केलेली “समसॅन’ सारखी गोळी दात येताना देणे उत्तम असते. याने मुलाची ताकद टिकून राहते व रोगप्रतिकारयंत्रणा सक्षम राहते.

५) सर्दी-खोकला झाल्यास सितोपलादी चूर्ण, “ब्रॉंकोसॅन सिरप’ देण्याचा उपयोग होतो. बेहडा, ज्येष्ठमध, अडुळशाची पाने याचा काढा किंवा गवती चहा, तुळशीची पाने, ज्येष्ठमध यांपासून केलेला “हर्बल टी’ मुलांना द्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु