कडूलिंबाचे ‘हे’ ५ उपाय करा, दूर होतील विविध आजार, जाणून घ्या

कडूलिंबाचे ‘हे’ ५ उपाय करा, दूर होतील विविध आजार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कडूलिंबाच्या पानांना काही धार्मिक कार्यात खूप महत्त्व असते. तसेच या झाडाची पाने, साल, मूळ, खोड, फळे, सर्वकाही औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने त्यांचा वापर विविध औषधींमध्ये केला जातो. लिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लिंब शरीराला शीतलता देतो. तसेच हृदयासाठी लाभदायक आहे. यामुळे पोटातील जळजळ, गॅस, ताप, कफ, त्वचेशी संबंधित रोग नष्ट होतात.

असे करावे सेवन

लिंबाचा रस तयार करण्यासाठी लिंबाची कोवळी पाने बारीक कुटून घ्या. मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालतील. बारीक केलेल्या पानांमध्ये स्वच्छ पाणी मिसळून सुती कपड्याने गाळून घ्यावो. या पाण्यामध्ये चवीनुसार काळे मीठ टाकावे. दररोज सकाळी हा लिंबाचा रस तयार करून घेतला जातो. हा रस अँटीसेप्टिकचे काम करतो. दररोज सकाळी लिंबाची चार-पाच कोवळी पाने सुद्धा खाल्ल्यास चांगला फायदा होतो.

हे आहेत उपाय

* दोन लिटर पाण्यात लिंबाची पन्नास पाने टाकावी. पानांचा रंग बदलून पाणी हिरवट होईपर्यंत उकळवावे. हे पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवावे. रोज अंघोळ करताना यातील १०० मिली पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे. यातील एंटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला होणारे संसर्ग, व्हाइट हेडची समस्या दूर करतात.

* लिंबाची पाने उकळून त्यात मध मिसळावा. ही पेस्ट केस आणि केसांच्या मुळांना चांगल्या प्रकारे लावावी. यामुळे केसांतील शुष्कपणा, कोंडा कमी होतो.

* लिंबाची काही पाने आणि संत्र्याच्या काही साली पाण्यात टाकून उकळा. या पातळ पदार्थात मध, दही आणि सोया मिल्क टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट लावल्यास त्वचा निरोगी राहते.

* लिंबाच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण तयार करून रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

* लिंबात संसर्गविरोधी घटक आणि एनाल्जेसिक प्रॉपर्टीज असतात. हे घटक त्वचेला अँलर्जी आणि संसर्गापासून वाचवतात. लिंबाची पाने उकळवून हे पाणी संसर्ग झालेल्या ठिकाणी लावावे. काही दिवसांत फरक पडतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु