‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे

‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  थायरॉइडच्या आजाराचे दोन प्रकार असून यातील भेद माहित असणे आवश्यक आहे. शरीरात थायरॉइड हार्मोनचा समतोल राहणे आवश्यक असते. थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झाल्यास हायपरथायरॉइडीझम हा आजार होतो. तर या उलट थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झाल्याने होत असलेल्या आजाराला थायरोटॉक्सिकोसिस – हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात. या दोन्ही आजारांची लक्षणे साधारणत: सारखीच असली तरी उपाय मात्र वेगवेगळे आहेत.

ही आहेत लक्षणे
१ विनाकारण वजन कमी होणे.
२ हाताला कंप सुटणे.
३ जुलाब होणे.
४ ऊन आणि गर्मी सहन न होणे.
५ दरदरून घाम येणे.
६ छातीत धडधडणे.

असा ओळखा फरक
*थायरोटॉक्सिकोसिस
१ थायरोटॉक्सिकोसिस हा बरेच वेळा थायरॉइडायटीसमुळे होत असतो.
२ थायरॉइडायटीस हा छोट्या मुदतीचा आजार आहे.
३ या आजाराकरता तात्पुरती औषधयोजना करावी लागते.

*हायपरथायरॉइडीझम
१ हायपरथायरॉइडीझम हा मुख्यत: ग्रेव्हज या आजारामुळे होतो.
२ या आजारात थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय असते.
३ ग्रेव्हज या आजारात डोळे, त्वचा व नखांवरदेखील परिणाम होत असतो.
४ डोळ्यांना सूज येणे, लाल होणे व बाहेर येणे अशी लक्षणे दिसतात.
५ या आजाराचे निदान रक्तातील टी ३, टी ४, टीसीएच या तपासणीने होऊ शकते.
६ हा दीर्घ मुदतीचा आजार नियमित औषधे घेतल्याने बहुअंशी बरा होतो.
७ यात रेडिओ आयोडीन थेरपी व सर्जरीची गरज पडू शकते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु