थंडीत अशी घ्या ! आपल्या नाजूक त्वचेची काळजी

थंडीत अशी घ्या ! आपल्या नाजूक त्वचेची काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लवकरच थंडी सुरू होणार आहे. या काळात थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे सौंदर्य बाधित होते. जास्त थंडीमुळे कधीकधी त्वचा बधिर होते. ओठ, हातपाय प्रभावित होतात. यामुळे विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेवूयात.

अशी घ्या काळजी
* थंड पदार्थ खाणे टाळावे.
* पाणी उकळून प्यावे.
* दही, तेलकट असे अँलर्जी निर्माण करणारे पदार्थ टाळा.
* सकाळी बाहेर जाताना नाक व कानात हवा जाणार नाही याची काळजी घ्या.

हे उपाय करा
१) मधाच्या रसात लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावा.
२) गाजर, टोमॅटो व काकडी समप्रमाणात घेऊन त्यात २ थेंब लिंबाच्या रसाचे टाका. हे मिश्रण रोज अर्धा तास लावून थंड पाण्याने धुवावे.
३) पपईचा गर अर्धा तास लावल्याने त्वचा चमकदार होते, रुक्षपणा जातो.
४) रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाबपाणी व ग्लिसरीन लावून झोपा. त्वचा चकचकीत राहते, सुरकुत्या पडत नाहीत.
५) दुधात २ बदाम भिजवून, साल काढून वाटावे व थोडा संत्र्याचा रस घालून लावल्याने त्वचा बधिर होत नाही.
६) कोरड्या त्वचेसाठी बेसन, हळद, मध व लिंबाच्या रसाचा पॅक करून लावल्याने कोरडेपणा कमी होतो.
७) मध, दही व मुलतानी माती समप्रमाणात एकत्र करून लावा. यामुळे ओलावा टिकून राहतो आणि त्वचेचे सौंदर्य वाढते.
८) एरंडीचे तेल समप्रमाणात लिंबाच्या रसात मिसळून चेहरा व शरीरावर लावल्याने त्वचा कोरडी पडत नाही, ओरखडे उठत नाहीत.

हे सेवन करा
* मूग, चणे यांना आहारात प्राधान्य द्या.
* ताजी फळे किंवा सॅलड जास्त खा.
* दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या.
* शक्य असल्यास काही प्रमाणात सुका मेवा खा.
* रात्री झोपताना किमान १ ग्लास दूध प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु