अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या शरीराच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून अनेकजण पैशासाठी जास्तीत जास्त काम करतात. यामुळे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होते. अशा प्रकारे जास्त काम करणे, अवेळी जेवण करणे, पूर्ण झोप न घेणे यासारख्या सवयींचा परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.

गाजरात भरपूर पोषक द्रव्ये असतात, त्यामुळे गाजराचा रस पिल्याने ऊर्जा मिळते.झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून ते प्यावे. तसेच शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल. लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात. शरीराला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभऱ्याचे सेवन करावे.

यामुळे थकवा दूर होईल. कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे जंक फूड खाण्याचे टाळावे. दीर्घ काळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करीत राहावे. यामुळे पचन क्रिया चांगली राहील. जेवणानंतर लगेचच झोपू नये, यामुळे जास्त आळस येतो. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे लवकर थकवा येतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु