निरोगी, सदृढ बाळासाठी गरोदरपणात ‘या’ १२ पद्धतीने घ्या काळजी

निरोगी, सदृढ बाळासाठी गरोदरपणात ‘या’ १२ पद्धतीने घ्या काळजी

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आपले बाळ सुदृढ जन्माला यावे, असे सर्वच मातांना वाटते. यासाठी गरोदरपणात मातेने विशेष काळजी घेतली पाहिजे. मातेचे आरोग्य चांगले असेल तरच बाळ निरोगी जन्माला येते. मातेच्या आहाराचा गर्भस्थ शिशुवर खुप परिणाम होत असतो. यासाठी गरोदर मातेने कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

अशी घ्या काळजी
१ मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार असल्यास गरोदरपणात नियमित औषध घ्यावे. डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.

२ सुरूवातीच्या काळात जीव घाबरणे, उलट्या, रक्तदाब असा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

३ पोटात दुखणे, रक्तस्त्रास होणे हे गंभीर असल्याने असा त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.

४ गरोदरपणात मातेने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेवू नये.

५ गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेली इंजक्शने घ्यावी. तसेच आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करावे.

६ धान्य, भाज्या, फळ, विना फॅट्सचे मटण, कमी वसेयुक्त दुध, नारळ पाणी इत्यादी पौष्टिक आहार घ्यावा.

७ मूत्रविसर्जनात अडचण येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

८ गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत जवळच्या सरकारी रुग्णालयात नावनोंदणी करावी.

९ गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घ्यावेत.

१० गर्भधारणाच्या वेळेस रक्तगट, आर. एच. फॅक्टरची चाचणी करून घ्यावी. हिमोग्लोबिनची चाचणी वेळो वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

११ लघवीमध्ये प्रोटीन अल्बोमीन बघण्याकरिता लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घ्यावे. लघवीमध्ये अल्बोमीनचे प्रमाण जास्त असल्यास गरोदरमातेच्या पायावर, अंगावर सूज येऊ शकते.

१२ प्रत्येक गरोदर मातेने रक्तदाब तपासून घ्यावा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु