गोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा

गोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गोड पदार्थ बहुतकरून लोकांना आवडतात. मात्र संपूर्ण दिवसभर किंवा जेव्हा जमेल तेव्हा गोडधोड पदार्थ खात राहणं हे शरीराच्या आणि विशेषतः दातांच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. जर तुम्ही गोडपदार्थ खाल्ल्यावर तुमच्या दातांमध्ये कळ किंवा संवेदनशीलता जाणवत असेल तर तुमच्या दातांमध्ये कॅव्हिटी झाली आहे, असं समजावं. गोडपदार्थ खाताना थोडी काळजी घेतली तर दातदुखीच्या समस्या त्रास देणार नाहीत. अन्यथा दातांना लागणारी कीड आणि त्यावर करावे लागणारे उपचार यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल.

दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयीच्या जाणून घेऊयात काही खास टिप्स –

१) चिकटणारे पदार्थ दातांमध्ये अडकतात. जे पदार्थ लवकर विरघळतात, असे पदार्थ खाण्यावर भर द्या, कारण त्यांचा तुमच्या दातांवरील आवरणाशी कमी संबंध येतो. दाताला चिकटणार नाहीत असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या.

२) कृत्रिम रंग टाकलेले पदार्थ किंवा चहा -कॉफी जास्त घेणे टाळा. कारण त्याचे दातावर डाग पडतात. दातांवर असणाऱ्या इनॅमल कोटींगसाठी कृत्रिम रंग घातक आहेत.

३) जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी प्या.

४) नाश्ता आणि जेवणानंतर ताबडतोब खळखळून चूळ भरा. त्यामुळे अन्नाचे कण तुमच्या दातांमध्ये अडकणार नाहीत.

५) खाल्ल्यानंतर ब्रश करायला विसरू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु