उत्तम आरोग्यासाठी ‘ही’ काळजी आवश्य घ्या, काही नियम पाळणे गरजेचे

उत्तम आरोग्यासाठी ‘ही’ काळजी आवश्य घ्या, काही नियम पाळणे गरजेचे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम, आहार महत्वाचा आहे. शिवाय, काही नियम आपण पाळले तरच आरोग्य चांगले राहू शकते. हे नियम पाळले तर शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. योग्य दिनचर्या, उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलन या चार नियमांचे योग्य पालन प्रत्येकाने केले तर आरोग्य उत्तम राहते. याविषयी सविस्तर जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

१) नियमित तपासणी करावी व भरपूर पाणी प्यावे.
२) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वयानुरूप तपासण्या करा.
३) एकाच वेळी भरपूर जेवू नका. दिवसातून चार वेळा खावे.
४) आहार उतरत्या क्रमात ठेवा. सकाळची न्याहारी चांगली असावी. त्यानंतर जेवणाचे प्रमाण थोडे थोडे कमी करावे. रात्री कमी जेवावे. सकस आहार घ्यावा.
५) अत्यंत तेलकट, तूपकट पदार्थ टाळा.
६) सकाळी लवकर उठा.
७) सर्व प्रकारच्या भाज्या-पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
८) आहारात फळे, दूध, अंडी, सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश करा.
९) आवश्यकतेनुसार तेल आणि तुपाचा वापर करा.
१०) नियमितपणे वेगाने चालणे, धावणे, योगीक व्यायाम, प्राणायाम, ध्यान, चिंतन करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु