वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण आपल्या त्वचेबाबत खूपच काळजी घेतो. महिन्यातून किमान एकदा तरी आपण पार्लर मध्ये जातो. अशा वेळी आपण खूपच चोखंदळ असले पाहिजे.  पार्लर मोठे असो की लहान पण नेहमी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊ नक्की कोणत्या गीष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

१. वॅक्सिंग करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्वच्छ आहे का ते पहा
प्रत्येक व्यक्तीस वॅक्सिंग करताना एकच साहित्य वापरले जाते का याकडे लक्ष द्या. कारण वॅक्सिंगचे साहित्य थेट त्वेचवर वापरले जात असल्याने त्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक सतर्क रहावे. जेल वॅक्सिंगसाठी वापरले जाणारे भांडे स्वच्छ असावे तसेच जेल लावण्यासाठी वापरली जाणारी वस्तूही तितकीच नेटकी असावी.

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

२. धुतलेले किंवा नवीन कपडे दिले जाते का ते पहा
वॅक्सिंग करताना जो कापड वापरला जातो तो स्वच्छ आहे का ते पहा. या कापडाने आपली त्वचा पुसली जाते तर ते नेहमी स्वच्छ किंवा नवीन असणे गरजेचेच असते.

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !
३. पार्लर मधील चादर किंवा खुर्च्यांची कव्हर्स स्वच्छ आहे का ते पहा
पार्लर मध्ये विविध क्रिम्स व पाण्याच्या सततच्या वापरामुळे पार्लर मध्ये कुबट वास येण्याची शक्यता असते. ते वास दूर करण्यासाठी पार्लर मधील चादर किंवा खुर्च्यांची कव्हर्स स्वच्छ असणे गरजेचे आहे.
वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु