हिवाळ्यात ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी; दुर्लक्ष करणे ठरू शकते घातक

हिवाळ्यात ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी; दुर्लक्ष करणे ठरू शकते घातक

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  हिवाळ्यात विविध प्रकारचे आजार त्रास देतात. यासाठी या काळात आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. याकडे दुर्लक्षे केल्यास ते घातक ठरू शकते. या काळात वातावरणात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे सर्दी, खोकला अशा समस्या जाणवतात.

अशी घ्या काळजी
१ त्वचेची काळजी घ्या. या काळात त्वचारोग किंवा स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

२ थंडीमध्ये व्यायाम करा. थंडीत घाम येत नसल्याने शरीरातील उत्सर्जन काही प्रमाणात कमी झालेले असते, त्याची कमतरता व्यायामाने भरुन निघते.

३ शरीराची मालिश केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने अंघोळ करताना पाण्यात मीठ, इलायची, तुळस किंवा मग कडुनिंबाची पाने पाण्यात टाका.

४ थंडीमध्ये गरम आणि हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करा. थंड पेय, पदार्थ खाणे टाळा. आहारात आवला, तुळस, त्रिफळा यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश करा.

४ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराची तिळ किंवा सूर्यफूलाच्या कोमट तेलाने मालिश करा. यामुळे स्नायू मजबूत होतात. रक्ताभिसरण नियमित होते.

५ नियमित पूर्ण आणि शांत झोप घ्या. यामुळे शरीराला ताकद मिळते.

* प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असल्याने कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु