पावसाळ्यात कपड्यांची घ्या ‘अशी’ काळजी, जाणून घ्या

पावसाळ्यात कपड्यांची घ्या ‘अशी’ काळजी, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडता आहे. पावसाळा हा निर्सगावर हिरवीगार शाल पांघरतो. पण पावसाळा आला कि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तसेच पावसाळ्यात अचानक कधी पाऊस पडेल ते सांगता येत नाही आणि पावसाळ्यात जास्त ऊन पडत नसल्यामुळे कपडेही वाळत नाहीत. त्यामुळे आपल्याला कपड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पावसाळ्यात कपड्यांची काळजी कशी घ्यावी. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१) पावसाळ्यात आपल्या कपड्यांच्या ओलसरपणामुळे त्यांना बुरशी येते. यामुळे त्वचेला खाज, पुरळ उठणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी पावसात भिजलेले कपडे साचवून ठेवू नयेत. खालीलपैकी उपलब्ध पर्यायाचा वापर करुन लवकर धुवून व सुकवून घ्यावे.

२) पावसाळ्यात कपडे सुकविण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे, पंख्याची हवा, खोलीभर कपडे पसरवले, की कमीतकमी वेळात कपडे सुकतात किंवा पुरेशी जागा असल्यास दोरी बांधण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. यामुळे तुमचे आरोग्यही उत्तम राहील आणि कपडेही लवकर वाळतील.

३) तुमच्या घरात वॉशिंग मशीनसोबत ड्रायर मशीन असेल  गरजेनुसार त्यावर दिलेल्या पर्यायांचा वापर केल्यास कपडे सुकविण्याचे काम सोपे होते.

४) तुम्हाला जर लवकर कपडे सुकवायचे असतील तर हेअर ड्रायरचा वापर करु शकता.

५) कपडे सुकवण्यासाठी दोरी नसेल तर स्टॅंड उपयोगी ठरतो. कपड्यांच्या प्रमाणानुसार त्याचा आकार लहान मोठा करता येतो.

६) कपडे सुकवण्यासाठी इस्त्रीचा वापर करु शकता. हा प्रयोग करताना कपड्याचा पोत समजून इस्त्रीचा वापर करायला हवा. नाहीतर घाईघाईत वारलेला हा शॉर्टकट काम वाढवून ठेवेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु