पावसाळ्यात किटाणूंपासून आजार होऊ नये म्हणून घ्या हि काळजी

पावसाळ्यात किटाणूंपासून आजार होऊ नये म्हणून घ्या हि काळजी

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पावसाळ्यात जुलाब-उलट्या, हगवण हे आजार पसरतात. जुलाबाचे मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी. पाणी स्वच्छ आणि पुरेसे पाहिजे. राहणीमान सुधारण्याने स्वच्छता वाढते आणि रोग कमी होतो. ज्या लोकांना अपुरे, अशुध्द पाणी मिळते त्यांना या प्रकारचे आजार सतत होतात. लहान मुलांमध्ये तर जुलाब, अतिसार प्रमाण फार आहे. मुख्य म्हणजे मानवी किंवा प्राण्यांची विष्ठा आणि पिण्याचे पाणी यांचा संबंध आला तर हे आजार उद्भवतात. हे सर्व रोग माशांमुळे किंवा इतर किटाणूंमुळे होतात. गटारातील पाण्यावर किंवा प्राण्याची विष्टा असे कशावरही बसतात आणि तेच पुन्हा आपल्या जेवणावर येऊन बसतात.आपण तेच खातो त्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात.

हे आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल 

१) यासाठी हातांची, भांड्यांची स्वच्छता, नखे कापणं, अन्न सुरक्षित ठेवणं, हि काळजी घेणं आवश्यक आहे.

२) संध्याकाळी घरात कापूर आणि दूर जाळला तर घरातील माश्या कमी होतील.

३) घरासमोर तुळशीचे झाड लावा. त्याने माशा कमी होतील.

४) खिडक्यांच्या जाळयांना मच्छरदाणी लावा. बाहेरून घरी गेल्यावर हात पाय स्वच्छ धुवा.

५) किचन कायम स्वच्छ ठेवावे. घरातील खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु