डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या पावसाळा चालू झाला आहे. पावसाळा म्हणला की डासांची समस्याही चालू होते. त्यात साचलेले पाणी डासांच्या वाढी साठी जास्त परिणामकारक ठरतात. अशाच डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजारही होण्याची शक्यता असते. आता त्यातभर म्हणून डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. अशा या झिका वायरस वर आजून तरी औषध उपलब्ध नाही. तर अशा  या आजारापासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी आज जाणून घेऊ काही घरगुती उपाय;

– दिवसभराच्या कामामुळे आपण घराच्या बाहेर पडतो. डासांपासून दूर राहण्यासाठी काही केमिकल युक्त क्रीमही लावतो. पण याचा काहीच उपयोग जाणवत नाही. तर अशा वेळी डासांना दूर ठेवण्यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करून अंगाला लावा. याचा परिणाम साधारणतः ८ तास राहतो.

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

– याचबरोबर तुम्ही लिंबाचे तेल आणि निलगिरी तेलाचे मिश्रण करूनही शरीराला लावू शकता. अथवा घरात एका कोपऱ्यात छोट्या वाटीत हे मिश्रण ठेऊ शकता. यामुळे डास घरात शिरकाव करत नाही.

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

– घरातील डास पळून लावण्यासाठी कॉईलचा वापर जास्त केला जातो. पण याच्या धुरामुळे अस्थमा होण्याची शक्यता असते. तर यावर घरगुती उपाय म्हणून घरात कापूर १५ ते २० मिनिट जळत ठेवा . याच चांगला फायदा तुम्हाला जाणवेल.

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

– जर तुम्ही या पावसाळ्यात घराच्या अंगणात पुदीना, लिंबू, झेंडू, कडुलिंब ही झाडे लावल्यास डास घरात येणार नाही.

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

– तुळस मच्छरांना घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करते. दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तर मच्छर दूर पळून जातात.

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

– लव्हेंडर युक्त रूम फ्रेशनरचा वापर करावा. लव्हेंडरच्या सुगंधानेही डास दूर पळतात.

डासांना दूर करण्यासाठी कमी खर्चाचे ‘हे’ घरगुती उपाय करा

– डासांना पळून लावण्यासाठी लसूण ही उपयुक्त आहे. लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. तर लसूण किसून पाणयात उकणून ते पाणी घरात ठेवावा. यामुळे डास दूर पाळतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु