लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे आढळल्यास असू शकतो ‘अ‍ॅनिमिया’

लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे आढळल्यास असू शकतो ‘अ‍ॅनिमिया’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या रक्तामध्ये पुरेश्या निरोगी लाल रक्तपेशी नसल्याने हा विकार उत्पन्न होतो. शरीरातील प्रत्येक अवयवाला प्राणवायूचा पुरवठा करणे हे लाल रक्तपेशींचे, किंवा हिमोग्लोबिनचे काम असते. आणि लहान मुलांच्या रक्तामध्ये पुरेश्या निरोगी किंवा लाल रक्तपेशी नसल्याने हा विकार उत्पन्न होतो. शरीरातील प्रत्येक अवयवाला प्राणवायूचा पुरवठा करणे हे लाल रक्तपेशींचे, किंवा हिमोग्लोबिनचे काम असते. ते जर पूर्ण झाले नाही. तर मुलांना अ‍ॅनिमिया होण्याचा धोका असतो.

अ‍ॅनिमिया असण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे :

१) अ‍ॅनिमियाच्या विकारामध्ये लहान मुलांचा चेहरा फिकट दिसू लागतो. त्यांना सतत थकवा जाणवतो. आणि मुले चिडचिडी होऊ लागतात.

२) जर लहान मुलांच्या शरीरामध्ये लोह आणि इतर पौष्टिक तत्वांच्या अभावी पुरेश्या लाल रक्तपेशी तयार होत नसतील. तर लहान मुलांना अ‍ॅनिमिया होण्याचा धोका असतो.

३) शरीरामध्ये इतर कोणती व्याधी असेल, आणि त्याचे निदान झालेले नसेल, तर त्या व्याधीमुळे शरीरातील निरोगी लाल रक्तपेशी नष्ट होऊ लागतात. अश्या वेळीही अ‍ॅनिमिया उद्भवू शकतो.

४) नखे आणि डोळेही गुलाबी न दिसता फिकट, पांढरे दिसू लागतात. अ‍ॅनिमिया असलेली लहान मुले जास्त श्रम न होताही सहज थकून जातात.

५) मुलांच्या हाता-पायांवर हलकी सूज दिसून येते. तसेच मुलांना वारंवार दम लागतो. अश्या मुलांचे हृदयाचे ठोकेही जलद पडताना दिसून येतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु