या कारणामुळे होतो “ब्रेस्ट कॅन्सर” जाणून घ्या याची लक्षणे

या कारणामुळे होतो “ब्रेस्ट कॅन्सर” जाणून घ्या याची लक्षणे

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – महिलांमध्ये सध्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अतिशय वाढले आहे. जवळपास ३३ टक्के महिलांना या आजाराने ग्रासले आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आजार आहे. परंतु यावर सध्या उपचार उपलब्ध असल्याने हा कॅन्सर पूण बरा होऊ शकतो. आणि यावरील उपचार जास्त महागडे नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही.

का होतो ब्रेस्ट कॅन्सर 

१) अनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

२) वयाच्या १२व्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू झाली असल्यास हा कर्करोग होतो.

३) वयाच्या ५५व्या वर्षानंतर मासिक पाळी बंद झाल्यास कर्करोग होतो.

४) कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकानेही हा कर्करोग होऊ शकतो.

५) व्यसानाधिनतेमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो.

६) ज्या महिलामध्ये लठ्ठपणा आहे त्यांनाही हा कॅन्सर होण्याची भीती जास्त असते.

 ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे 

ज्या महिलेला हा कॅन्सर झाला आहे. किंवा होण्याची शक्यता आहे. त्या महिलांच्या स्तनाच्या ठिकाणी कठीणपणा किंवा गोळा येतो. किंवा स्तनाच्या ठिकाणी सूज किंवा बारीक खळगा पडतो. स्तनाच्या ठिकाणी न थांबणारी खाजेची समस्या जाणवते. स्तनाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा येतो. तसेच स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल. स्तनाग्रातून स्राव होतो. किंवा स्तनामध्ये वेदना होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु