पाठदुखीने त्रस्त आहात ? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे

पाठदुखीने त्रस्त आहात ? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पाठदुखीने बहुतांश लोक त्रस्त असतात. ही समस्या होण्यामागे विविध कारणे असतात. परंतु, चुकीच्या सवयींमुळे ही समस्या जवळपास सर्वच वयोगटात दिसून येते. या दुखण्यावर पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास ताबडतोब आराम मिळू शकतो.

हे आहेत उपाय

मानसिक ताण
सतत तणावाखाली राहिल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे पाठदुखी होऊ शकते. मन:शांती टिकवून ठेवा. यासाठी योगासने, प्राणायाम करा.

धुम्रपान
धुम्रपानामुळे जिवघेण्या आजारांस पाठदुखी ही सुद्धा होते हे फारच कमी लोकांना माहीत आहे. धुम्रपानामुळे मोठय़ा प्रमाणात पाठदुखी होऊ शकते, असे संशोधकांना आढळून आले आहे.

झोपण्याची पद्धत
झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखी होऊ शकते. पाठीवर किंवा पोटावर झोपल्याने पाठदुखी होऊ शकते. यासाठी एका कुशीवर झोपा. तसेच शांत आणि पूर्ण झोप घ्या.

चालणे, बसणे
चुकीच्या पद्धतीने चालणे, बसणे, यामुळे सुद्धा पाठदुखी होऊ शकते. काम करताना नेहमी सरळ बसा. चालताना सुद्धा सरळ चालले पाहिजे. पोक काढून, पुढे झुकून चालणे अथवा बसणे टाळा.

जड वस्तू उचलताना
कोणतीही जड वस्तू उचलताना सावध रहा. योग्यपद्धतीनेच वजनदार वस्तू उचला.

स्ट्रेचिंग एक्सरसाइज
स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यास पाठदुखी बंद होईल. परंतु, स्ट्रेचिंग एक्सरसाइज योग्य पद्धतीने करा. पाठीचे मणके सशक्त बनवा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु